सायली कांबळे विवाहबंधनात.. | Indian Idol 12's Sayli Kamble gets married to boyfriend Dhawal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sayali kamble wedding

गायिका सायली कांबळे विवाहबंधनात..

सोनी वाहिनीवरील (sony) इंडियन आयडलचे १२ (indian idol season 12) वे पर्व अविस्मरणीय ठरले. या पर्वाला लाभलेले स्पर्धक आणि एकूणच मंचावरील वातावरण यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षक या पर्वाशी जोडले गेले होते. जेव्हा या पर्वाला टॉप १५ (top 15) स्पर्धक मिळाले तेव्हा या कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. याच पर्वातील एक महत्वाची आणि टॉप १५ मधली स्पर्धक म्हणजे सायली कांबळे. (sayali kamble) सायलीने आपल्या सुमधुर गाण्याने रसिकांची मन जिंकली. आता मात्र सायलीच्या गाण्याची नाही तर लग्नाची चर्चा आहे.

हेही वाचा: 'शेर शिवराज'ची विक्रमी घोडदौड, एका दिवसात कमावले..

सायली विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा गेली काही दिवस सुरु होती. डिसेंबर महिन्यात तिने आपल्या प्रियकरासोबत म्हणजे धवल सोबत साखरपुडा केला. गेली अनेक वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. याबाबत सायलीने स्वतःहून माहिती दिली होती. विशेष म्हणजे तिच्या साखरपुड्यानंतर ती लग्न कधी करणार याची उत्सुकता शिगेला गेली होती. अखेर सायली विवाहबंधात अडकली आहे. रविवारी २४ एप्रिल रोजी धवल आणि सायलीने लग्नगाठ बांधली.

या लग्नसोहळ्याला इंडियन आयडल मधील नचिकेत लेले आणि निहाल तौर यांनीही हजेरी लावली होती. तसेच अनेक स्पर्धकांनी तिला सोशल मिडीआवरून शुभेच्छा दिल्या. मुंबईजवळील कल्याणमधील एका रिसॉर्टमध्ये पारंपारिक मराठी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. सायली आणि धवल हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत ते सतत अपडेट देत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Web Title: Indian Idol 12s Sayli Kamble Gets Married To Boyfriend

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top