'शेर शिवराज'ची विक्रमी घोडदौड, एका दिवसात कमावले..

दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित 'शेर शिवराज' याच चित्रपटाने एका दिवसात विक्रमी कमाई केली आहे. तसेच प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे.
sher shivraj
sher shivrajsakal

दिग्पाल लांजेकर म्हणजे महाराष्ट्राला चित्रपटाच्या माध्यमातून शिव प्रेमाचे वेड लावणारा दिग्दर्शक, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम आपल्या कामातून व्यक्त करून अवघ्या जगाला त्याने शिवमय केलं आहे. नुकताच त्याचा 'शेर शिवराज' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आता काही विक्रम मोडायला सुरुवात केली आहे.

sher shivraj
शेर शिवराज नंतर आता थरार या महत्वपूर्ण मोहिमेचा ..

काही वर्षांपूर्वी दिग्पालने (digpal lanjekar) छत्रपती शिवाजी महाराजांवर 'शिव अष्टक' ही चित्रपट मालिका करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यातील चार चित्रपट प्रदर्शित झाले असून आता पाचव्या चित्रपटाचे वेध लागले आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज (sher shivraj) असे हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पावनखिंड हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात रिलीज झाला होता. या चित्रपटानेही विक्रमी कमाई केली. त्या नंतर लगेचच म्हणजे २२ एप्रिल रोजी 'शेर शिवराज' हा चित्रपट प्रदर्शित करण्यातआला. विशेष बाब म्हणजे अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने यशाची मोहर उमटवली आहे.

ट्रेड ऍनालिस्ट (trad analyst) तरन आदर्श (taran adarsh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २२ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होताच या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. एका दिवसात १. ०५ करोड रुपये (1.05 cr ) इतकी कमाई झाली. शिवाय सर्व शो हाउसफुल्ल झाले असून प्रेक्षकांचा वाढत प्रतिसाद पाहून या चित्रपटाला चित्रपटगृहाने लहान चित्रपट गृहातून मोठ्या चित्रपटगृहात शिफ्ट केले आहे. तसेच सर्व शो ऍडव्हान्स मध्ये हाऊसफुल्ल झाले आहेत. मराठी चित्रपटाच्या यशातील हा एक महत्वाचा चित्रपट आहे,' असे ट्विट त्यांनी केले आहे. (AWESOME NEWS... #Marathi film #SherShivraj witnesses stunning growth in #Maharashtra... Fri ₹ 1.05 cr... The shows have not only doubled on Day 2 [Sat], but the film has been shifted from smaller audis to large ones... And most shows are #HouseFull in advance itself... Bravo!)

sher shivraj
'कोई मंत्र पढता है तो कोई नमाज' देशातील सध्यस्थितीवर मनोज वाजपेयी..

या चित्रपटात चिन्मय मांडलेकर (chinmay mandlekar) यांने 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची भूमिका साकारली आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये प्रेक्षकांना विनंती केली होती. 'चित्रपट मोबाईल वर चित्रित करण्याऐवजी चित्रपट गृहात जाऊन पहा' असे आवाहन त्याने केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com