
Indian Idol Marathi: आळंदीतील चैतन्याच्या स्वप्नांना मिळाले बळ
पुणे : इंडियन आयडल हा हिंदी विश्वातील गाजलेला आणि प्रसिद्ध असलेला रिॲलिटी शो मराठीसारख्या प्रादेशिक भाषेत सुरु झाल्यामुळे महाराष्ट्रातील नवोन्मुख कलाकारांना एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाचा मंच हा स्वप्नांची सांगता करणारा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांमधून पुण्यातील आळंदीमधील माउली नावाने प्रसिद्ध असणाऱ्या चैतन्य देवढेसाठी इंडियन आयडलचा मंच हा स्वप्न साकारण्याचा मंच ठरत आहे. (Indian Idol Marathi 2022 Updates)
मूर्ती लहान पण कीर्ती महान ही
म्हण तंतोतंत लागू पडणाऱ्या चैतन्यला पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे. असे म्हणतात एखादी संधी ओळखणं आणि त्या संधींचा सोन करणं हे माणसाला त्याच्या आयुष्यात पुढे घेऊन जाण्यास खूप मदत करते. चैतन्यलादेखील या संधीच्या माध्यमातून आपला संगीत प्रवास गाठता येणार आहे. आई गृहिणी आणि वडील कीर्तनकार असलेल्या सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या गायकाला ईश्वराने उपजत संगीतकलेची देणगी दिली आहे. कला ही माणसाला घडवते त्याचप्रमाणे चैतन्य हा लहानपणासून बघून बघून गाणे शिकत आलेला आहे.
जिद्दीने रियाज
वडिलोपार्जित कीर्तनकार घराण्याचा वारसा चालवत वडिलांचे गाणे ऐकून चैतन्यला गाण्याची ओढ लागली आणि वयाच्या ८ ते १० वर्षाचे असल्यापासून चैतन्य आपल्या वडिलांकडे गाणी शिकत आहे. तसेच गुरु रघुनाथ खंडाळकर यांच्याकडे तो शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे. चैतन्य नावाप्रमाणेच चुणचुणीत, आत्मविश्वासू, निडर या सगळ्या उपमा त्याला लागू पडतात. गोड गळ्याचा चैतन्य ऑडिशन राउंडपासून परीक्षकांची मनं जिंकत आहे. त्याच्या खेळकर स्वभावाने त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धकांनाही अल्पावधीतच आपलेसे केले.
टॉप १० पर्यंत चैतन्यने गाण्याच्या आणि आवाजाच्या साथीने परीक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. चैतन्यच्या सादरीकरणाला झिंगाट परफॉर्मन्स मिळाला असून उत्तमोत्तम गाणी सादर करण्याचा प्रयत्न चैतन्याकडून होत असतो. माउलींचा आशीर्वाद, घरून अर्थातच बाबांकडून लाभलेला सांगीतिक वारसा आणि मेहनत या सगळयांच्या साथीने 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्यासाठी चैतन्य जिद्दीने रियाज करतोय.
हेही वाचा: कोण आहे अबू इब्राहिम? स्वतःला उडवले बॉम्ब स्फोटाने
अजय - अतुल देवासमान
आपल्या प्रवासाबद्दल चैतन्य म्हणाला, गायनाची आवड लहानपणापासून होती, माउलींचा आशीर्वाद आणि जिद्दीच्या जोरावर मी इथपर्यंत पोचलो. अजय - अतुल सर हे माझ्यासाठी देवासमान आहे. जिथे शब्द कमी पडतात तेथे संगीत बोलते. लहानपानपासूनच एवढ्या मोठ्या संगीतकारांसमोर गाण्याची इच्छा होती. सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून ती पूर्ण झाली. त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे . यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते . त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे. तसेच ते आम्हाला योग्य मार्गदर्शन देखील करत आहे. या शो मुळे मी माझे आयुष्य बदलले आहे .
मंचावर आल्यावर काय बदल झाले ?
आत्तापर्यंत मी खूप रिअलिटी शो केले आहेत. लोकांकडून खूप भरभरून प्रेम मिळत आहे. इंडियन आयडल मराठीमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मंचावर आल्यावर एक पॉझिटीव्ह फील होता. आमचे मार्गदर्शक अजय परब दादा, मधुराताई खूप चांगल्या प्रकारे आमहाला मार्गदर्शन करतात. या मंचाने खूप लोक जोडली आहेत आणि छान कुटुंब तयार झाले आहे. संगीतामध्ये वयाची मर्यादा नसते. त्यामुळे आम्ही सर्व एकमेकांना मदत करतो.
Web Title: Indian Idol Marathi 2022 Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..