विराट-अनुष्काच्या घरी छोट्या परीचं आगमन

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 11 January 2021

विराटने चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी सोशल मिडिया ट्विटवर शेअर केली आहे.

मुंबई- क्रिकेटर विराट कोहली आणि पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विराट कोहलीने अनुष्का आणि बाळासाठी पॅटरनिटी सुट्टी घेतली होती. विराटने सांगितलं होतं की त्याला जेव्हा त्याच्या बाळाचं या जगात आगमन होईल तेव्हा त्या ाबळासोबत आणि अनुष्कासोबत हजर राहायचं आहे.आज सोमवार रोजी अनुष्काने मुलीला जन्म दिला. विराटने चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी सोशल मिडिया ट्विटवर शेअर केली आहे.

नुकतेच दोघं डॉक्टरांकडून चेकअप करुन जाताना काही दिलसांपूर्वी दिसले होते. विरुष्काच्या बाळाची सगळेचजण आतुरतेने वाट पाहत होते. विराट आणि अनुष्काचं हे पहिलंच अपत्य आहे. दोघांनी सोशल मिडियावरुन गुड न्युज शेअर केल्यापासून त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होती.  विराटच्या या पोस्टवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळेचजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 

हे ही वाचा: विकी कौशलच्या 'अश्वत्थामा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज होताच झाला व्हायरल  

indian skipper virat kohli and wife anushka sharma blessed with a baby girl  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian skipper virat kohli and wife anushka sharma blessed with a baby girl