विकी कौशलच्या 'अश्वत्थामा' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज होताच झाला व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 11 January 2021

'अश्वत्थामा' या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आज रिलीज केला गेला आहे जो एक वैज्ञानिक सिनेमा असून महाभारताच्या अध्यायातील एका पात्रावर आधारित आहे.

मुंबई- २०१८ मध्ये आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला सिनेमा आणि रॉनी स्क्रुवाला द्वारा निर्मित  'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'ने जबरदस्त कौतुक मिळवत सगळ्यांनाच हैराण केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर जबरदस्त हिट ठरला. या सिनेमाने तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवले. विकी कौशलला त्याच्या अभिनयासाठी तर आदित्य धरला त्याच्या दिग्दर्शनासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला होता. या सिनेमाने आज दोन वर्ष पूर्ण केली आहेत. अशातंच विकी, आदित्य आणि रॉनी या त्रिकुटाने त्यांच्या आगामी एकत्र असलेल्या प्रोजेक्टची घोषणा केला आहे. 'अश्वत्थामा' या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आज रिलीज केला गेला आहे जो एक वैज्ञानिक सिनेमा असून महाभारताच्या अध्यायातील एका पात्रावर आधारित आहे.

हे ही वाचा: अजय देवगणने बेकायदेशीर ऍपवरुन मेसेज करत अमिताभ बच्चन यांना असं केलं होतं हैराण...  

फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर आदित्यने सांगितलं की, ''आम्ही सगळे त्याच प्रेमाच्या आशेवर आहोत जे तुम्ही आम्हाला उरी या सिनेमासाठी गेली दोन वर्ष दिलंत. त्यामुळे आगामी सिनेमाच्या निमित्ताने आमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. अश्वत्थामासोबतंच आम्ही उत्तम व्हिजुअल सादर करण्यासाठी खूप मेहनत करत आहोत जे भारतातील प्रेक्षकांनी याआधी कधी पाहिलं नसेल. मी वचन देतो की हा केवळ एक सिनेमा नसेल तर एक वेगळा अनुभव असेल. मला आशा की जसं प्रेम तुम्ही उरीला दिलंत तसंच प्रेम अश्वत्थामाला देखील द्याल.''

अभिनेता विकी कौशलने 'अश्वत्थामा'ला त्याच्या सिनेकारकिर्दीतील सगळ्यात मोठा सिनेमा म्हटलं आहे. विकी सांगतो, ''अश्वत्थामा आदित्यचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रॉनी सारख्या दूरदृष्टी असणा-या माणसाची गरज होती. अभिनेता म्हणून माझ्यासाठी हा वेगळा अनुभव असेल जिथे मी अभिनयासोबतंच नवीन टेक्नोलोजी शिकेन. या अद्भुत टीमसोबत लवकरंच हा प्रवास करण्यासाठी उत्सुक आहे.''   

vicky kaushal film ashwatthama first look release poster went viral on internet  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vicky kaushal film ashwatthama first look release poster went viral on internet