मुंबई- देशात कोरोनाने अनेक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासत आहे. बॉलिवूडमधील अनेक कालाकारांनी कोरोना रूग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. काही कलाकरांनी कोरोना रूग्णांसाठी वैद्यकिय सुविधा दिल्या तर काहींनी त्यांना आर्थिक सहाय्य केले.
नुकतेच प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (nuradha paudwal) यांनी कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर (oxygen concentrators) दिले आहेत. अनुराधा यांनी सुर्योदय फाऊंडेशन या संस्थेमार्फेत मुंबईच्या जे जे रुग्णालयात तसेच माणगाव आणि अलीबाग येथील काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर दिले आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वजण कौतुक करत आहे. अनुराधा यांनी अयोध्येतील काही रुग्णालयांना देखील ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर दिले आहेत.(indian top singer anuradha paudwal donates oxygen concentrators to hospitals for covid 19 patient)
याआधी देखील अनुराधा यांनी 'सुर्योदर फाऊंडेशन' या संस्थेमार्फेत गरजू लोकांना मदत केली आहे. काही दिवसांपुर्वी दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या उपक्रमात देखील अनुराधा यांनी मदत केली. याशिवाय मागच्या वर्षापासून त्यांची ही संस्था करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहे. अनुराधा दरवर्षी आपल्या पतीचा वाढदिवस गरजू कलाकांरांची मदत करू साजरा करतात पण कोरोनाचा कहर पाहता त्यांनी मागिल वर्षापासून करोना रूग्णांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीमध्ये अनुराधा पौडवाल म्हणाल्या, 'कोणालाही मदत करण्यासाठी आपण श्रीमंतच असायला हवं असं नाही. करोनाच्या लढ्यात मदतीसाठी मी माझं योगदान दिलं आहे आणि मी इतरांनाही आवाहन करते की, त्यांनी त्यांचं योगदान द्यावं.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.