सेक्स-न्यूड सीन असे शूट होतात; दिग्दर्शक नाही तर 'त्या' व्यक्तीवर धुरा Gehraiyaan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone, Siddhant Chaturvedi  In Gehraiyaan

सेक्स-न्यूड सीन असे शूट होतात; दिग्दर्शक नाही तर 'त्या' व्यक्तीवर धुरा

दीपिका पदुकोण(Deepika Padukone),सिद्धांत चतुर्वेदी,अनन्या पांड्ये यांचा 'गहराइयां' हा सिनेमा त्यातील बोल्ड सीन आणि हटके स्टोरीलाइनमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रीलीज करण्यात आला. आता बहुतेक वेळा आपण पाहतो सिनेमाच्या शेवटी एक क्रेडीट प्लेट येते. ज्यावर कोणी कोणती जबाबदारी सिनेमा संदर्भात पार पाडली त्यांची नावं असतात. प्रामुख्याने निर्माता,दिग्दर्शक,लेखक,गीतकार वगैरे वगैरे. पण 'गहराइयां' या सिनेमाच्या त्या क्रेडिट प्लेटवर नेहमीच्या क्रेडिट लाइनपेक्षा एक नवी क्रेडिट लाइन निदर्शनास आली आणि त्याची चर्चा सुरू झाली. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक करतो हे सर्वप्रचलित आहे. आता संपूर्ण सिनेमा तोच दिग्दर्शित करतो हाच आपला समज. पण हा समजा चुकीचा ठरला आहे. कारण 'गहराइयां' मुळे एक नवीन गोष्ट प्रकर्षाने सर्वसामान्य प्रेक्षकांसमोर आली आहे ती म्हणजे सिनेमातील सेक्स-न्यूड सीन हे दिग्दर्शक दिग्दर्शित करीत नाही. तर ती जबाबदारी एका वेगळ्या व्यक्तीकडे असते.

ते सीन शूट करण्यासाठी त्यांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असते ती 'इंटिमसी डायरेक्टरकडे'.अर्थात ही पोस्ट काही वर्षांपासून सिनेसृष्टीत प्रचलित आहे. पण फक्त तिला सिनेमाच्या पोस्टरवर आतापर्यंत महत्त्व दिलं गेलं नव्हतं. पण आता 'गहराइयां' सिनेमातले सीन पाहता अर्धा अधिक सिनेमा या इंटिमसी डायरेक्टरनेच शूट केला असावा म्हणूनच त्याला सिनेमाच्या पोस्टरवर-टीझरवर क्रेडीट प्लेटवर झळकण्याची संधी देणं भागच होतं. पण यामुळे चर्चेला मात्र उधाण आलं आहे.असीम छाबरा यांनी ट्वीट करीत याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. असीम उत्तम लेखक आहेत. त्यांनी इरफान,शशी कपूर, प्रियंका चोप्रा सारख्या सेलिब्रिटींची बायोग्राफी लिहिली आहे. त्यांनी 'गहराइयां' सिनेमाची क्रेडिट प्लेट शेअर करत म्हटलं आहे,''मी कदाचित चुकीचा असू शकेन. पण भारतीय सिनेमात याआधी इंटिमसी डायरेक्टरसाठी क्रेडिट देताना पाहिलं आहे का? मी दार गाईला ओळखतो. आणि या सिनेमातील तिचं काम पहायला मी उत्सुक आहे''.

हेही वाचा: बच्चन कुटुंबावर पुन्हा कोरोना संकट; 'या' सदस्याला शूटिंग पडलं महागात

खरंतर कलाकारांना सेक्स अथवा न्यूड सीन करणं अनेकदा कठीण जातं. बऱ्याचदा त्यांच्यात तो कम्फर्ट निर्माण करण्याची जबाबदारी तेव्हा या इंटिमसी दिग्दर्शकावर येते. त्याला एखाद्या सेक्स सीनसाठी दोन्ही कलाकारांच्या वजनाचा विचार करून सगळं नियोजन करावं लागतं. भारतीय सिनेमात असे सीन शूट करणे म्हणजे मोठी जबाबदारी असते. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय ते सीन शूट करणं यासाठी इंटिमसी दिग्दर्शकाला खूप अभ्यासपूर्ण सगळं करावं लागतं. जर एखाद्या वेळेस एखादी अभिनेत्री तशा पद्धतीचा सीन करण्यात घाबरत असेल,भीती वाटत असेल किंवा तिला तो करायचाच नसेल पण सिनेमाची ती गरज असेल तेव्हा तिची समजूत काढण्याची जबाबदारीही त्या इंटिमसी दिग्दर्शकाकडे असते. हेच दिग्दर्शक ठरवतात अशा सीनसाठी कलाकार कोणते कपडे घालणार ते. त्याचसोबत अभिनेत्रीसोबत चुकीचं काही होणार नाही याची जास्त काळजी याच दिग्दर्शकांना घ्यावी लागते. सिनेमाच्या सुरुवातीलाच ठरवण्यात येतं की कोणता इंटिमसी दिग्दर्शक अशा सीनचे चित्रिकरण करणार. त्याचे काम फक्त टेक्नीकल नसते तर त्याचवेळी त्याला कलाकारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण तितकंच महत्त्वाचं असतं.

Web Title: Intimacy Director Shoot Sex Nude Scene Geheraiyaandeepika Padukonesiddhant Chaturvedi Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..