esakal | VIDEO - विराटचा अनुष्काला फ्लाइंग किस, वामिकाला अर्धशतक

बोलून बातमी शोधा

VIDEO - विराटचा अनुष्काला फ्लाइंग किस, वामिकाला अर्धशतक

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराटच्या टीमने चांगली कामगिरी केली. विराटने या सामन्यात नाबाद ७२ धावा केल्या.

VIDEO - विराटचा अनुष्काला फ्लाइंग किस, वामिकाला अर्धशतक
sakal_logo
By
टीम ई सकाळ

सध्या क्रिकेटर विराट कोहली आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करत आहे. आयपीलच्या एका सामन्यातील विराटचा खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराटच्या टीमने चांगली कामगिरी केली. विराटने या सामन्यात नाबाद ७२ धावा केल्या. या सामन्यामध्ये विराटने अर्धशतक पुर्ण होताच एक अशी खास गोष्ट केली ज्यामुळे अनुष्काला खूप आनंद झाला.

सामन्यादरम्यान अर्धशतक पुर्ण होताच विराटने प्रथम बॅट हवेत उंचवली. त्यानंतर अनुष्काला फ्लाइंग किस केले. हाताने बाळाला धरल्यासारखी पोज करून विराटने हे अर्धशतक त्याच्या मुलीला म्हणजेच वामिकाला समर्पित केले. विराटचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. व्हिडीओमध्ये विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू त्याला चिअर अप करताना दिसत आहे. सामन्याती विराट, अनुष्का आणि वामिकाच्या या सुंदर क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीलने सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 6 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला आहे.

हेही वाचा: "थोडीतरी लाज बाळगा"; 'मालदिव व्हेकेशन'वर असलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनने फटकारलं

क्रिकेट खेळाडू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला 11 जानेवारीला कन्यात्न झाले. त्यांनी मुलीचे नाव विराट आणि अनिष्काचे एकत्र करून ‘वामिका’ असे ठेवले. वामिकाचा जन्म झाल्यापासून तिला सोशल मीडिया आणि लाइमलाईटपासून दुर ठेवण्याचा निर्णय विरूष्काने घेतला.

एका मुलाखतीत अनिष्काने सांगितले होते, ‘आम्ही दोघंही लोकांच्या समोर आमच्या बाळाला मोठं करू इच्छित नाही. तिला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळावी असं मला अजिबात वाटत नाही. मला वाटतं ते आमच्या बाळाला स्वतःला वाटलं पाहिजे. कोणत्याही मुलाला हे कधीच शिकवलं जाऊ नये ते दुसऱ्यांसाठी किती स्पेशल आहेत. या गोष्टीचा आम्हाला त्रास होऊ शकतो. हे आमच्यासाठी कठीण आहे पण आम्हाला हे करायचं आहे.’ त्यामुळे विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर वामिकाचे फोटो शेअर करतात पण त्यामध्ये तिचा चेहरा दिसू देत नाहित.