Virat Kohli : अनुष्कानं 3 वेळा केलेला 'फ्लाईंग किस' गेला वाया! कोहलीच्या डोळ्यात पाणी

यंदाचा आयपीएल हा अनेक अर्थानं चर्चेत आला आहे. त्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यावेळी प्ले ऑफ मध्ये जाणाऱ्या चार संघाविषयी कमालीची उत्कंठा होती.
IPL 2023 Virat Kohli Century Anushka Sharma Royal
IPL 2023 Virat Kohli Century Anushka Sharma Royal esakal

Anushka Sharma Blows Kisses on Virat Kohli : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही काल रॉयल चॅलेंज बंगळुरु आणि गुजरात टायटन्सचा सामना पाहण्यासाठी आली होती. ज्यांनी तो सामना पाहिला असेल त्यामध्ये अनुष्काचा आनंद आणि तिचा उत्साह किती मोठा होता हे त्यांना माहिती आहे. विराटनं शतक ठोकल्यानंतर अनुष्कानं त्यांच फ्लाईंग किस देत केलेलं कौतूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे.

यंदाचा आयपीएल हा अनेक अर्थानं चर्चेत आला आहे. त्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यावेळी प्ले ऑफ मध्ये जाणाऱ्या चार संघाविषयी कमालीची उत्कंठा होती. त्यात सर्वाधिक चर्चा होती ती मुंबई आणि बंगळुरुची. काल मुंबईसाठी बिकट परिस्थिती होती. त्यांना काही करुन तो सामना जिंकावाच लागणार होता. शेवटी त्यांनी तो जिंकला. त्याचेवळी बंगळुरुमध्ये पाऊस सुरु झाला. मुंबईला विजय मिळाल्यानंतर त्यांच्या विजयाचा मार्ग काही अंशी सुकर झाला होता. पण त्यात बंगळुरु त्यांच्यासाठी अडसर ठरत होता.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

गुजरात आणि बंगळुरुच्या सामन्यात जर बंगळुरु जिंकले असते तर मुंबईच्या पदरी निराशा आली असती. मात्र गुजरातच्या शुभमन गिलनं जी खेळी केली त्याला तोड नव्हती. त्यानं विराटच्या शतकाला जशास तसं उत्तर दिलं आणि सोशल मीडियावर अनुष्का-विराटवरुन प्रतिक्रियांना उधाण आले आहे. विराटनं जेव्हा शतक साजरे केले त्यावेळी अनुष्कानं त्याला तीनवेळा फ्लाईंग किस करत शुभेच्छा दिल्या. त्याचं कौतूकही केलं होतं.

बंगळुरु पराभूत झाल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावरील निराशा लपून राहिली नाही. त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल झालेले मीम्स देखील भन्नाट असून त्यामध्ये अनुष्कानं तीनवेळा फ्लाईंग किस देऊनही बंगळुरुचा पराभव झाला. असे नेटकऱ्यांनी गंमतीत म्हटले आहे. गेल्या सोळा वर्षांपासून बंगळुरु संघाला विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे.

IPL 2023 Virat Kohli Century Anushka Sharma Royal
Viral Video : लग्न समारंभात महिलेचा नागीन डान्स; आवरता आवरेना

यावेळी काही झालं तरी बंगळुरु संघाला विजेतेपद मिळेल असे चाहत्यांना वाटत होते पण तसे झाले नाही. गिलच्या खेळीनं त्यांचे स्वप्नभंग झाले. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मीम्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात विराट कोहली आणि अनुष्कावर नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स तयार केले आहे.

IPL 2023 Virat Kohli Century Anushka Sharma Royal
The Kerala Story : केरळ स्टोरीच्या सोनिया बलानीला जीवे मारण्याची धमकी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com