इरफान खानच्या कबरीची वाईट अवस्था; मुलानेच लावली फुलझाडे

 Irrfan Khan Son Babil Grave Adorned With Rose
Irrfan Khan Son Babil Grave Adorned With Rose

 मुंबई -अगोदर बॉलीवूडमधल्या प्रस्थापित कलाकारांविरोधात आपल्या कामाने वेगवेगळे आव्हान उभे करणा-या प्रसिध्द अभिनेता इरफानला आयुष्याच्या शेवटापर्यत संघर्ष करावा लागला. इरफान खान याच्या वाट्याला मृत्युनंतही परवडच वाट्याला आली आहे. २९ एप्रिल २०२० रोजी इरफान खान याचे दुर्धर आजाराने निधन झाले. आता इरफान खानच्या कब्रीची वाईट अवस्था समोर आली आहे. त्याचा मूलगा बाबिलने याबाबत अधिक माहिती सोशल मीडियावर प्रसिध्द केली आहे.

बाबेलने काही दिवसांपूर्वी इरफानच्या कब्रीचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये या कब्रीची झालेली वाईट अवस्था दिसून आली होती. वडिलांच्या कब्रीची ही अवस्था पाहिल्यानंतर बाबिलने केलेल्या कामामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. इरफानने या कब्रीचे काही फोटो शेअर करुन एक भावूक पोस्ट लिहिली आहे. इरफानची दुरावस्था झालेली कब्र बाबिलने पुन्हा नव्याने बांधली असून त्यावर फुलझाडांची लागवड केली आहे.

२०१८ मध्ये इरफानला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्युमर हा कर्करोग झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्याने विदेशात जाऊन योग्य ते उपचारदेखील केले.मात्र, भारतात परतल्यानंतर २८ एप्रिल रोजी त्याची प्रकृती खालावली त्यामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान २९ एप्रिल रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. “जेव्हा एखादं लहान मुलं जन्माला येतं, तेव्हा ते अत्यंत नाजूक असतं. मात्र, जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी तो कठोर आणि असंवेदनशील होतो. त्याचप्रमाणे जेव्हा एखादं झाड वाढतं तेव्हा ते मऊ आणि लवचिक असतं. परंतु, कालांतराने ते झाडं सुकत जातं आणि ते मरुन जातं”, असं बाबिलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com