'या' सिनेमासह इरफान खान पुनरागमनाच्या तयारीत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

इरफानच्या चाहत्यांसाठी त्याचे आजारपण धक्कादायक असले तरी या चाहत्यांसाठीच आता एक आनंदाची बातमी आहे. इरफान लवकरच 'हिंदी मिडीयम 2' या सिनेमातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

मुंबई : अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सर उपचारासाठी परदेशात आहे. इरफानला न्यूरएंडोक्राइन ट्यूमर झाला असून तो लंडनमध्ये उपचार घेत आहे. काही आठवड्यापूर्वीच त्याचा 'कारंवा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन गेला. सिनेमाच्या प्रदर्शानापुर्वीच म्हणजे मार्च महिन्यात इरफानने त्याला कॅन्सर असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती. 

इरफानच्या चाहत्यांसाठी त्याचे आजारपण धक्कादायक असले तरी या चाहत्यांसाठीच आता एक आनंदाची बातमी आहे. इरफान लवकरच 'हिंदी मिडीयम 2' या सिनेमातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यापुर्वी 2017 ला 'हिंदी मिडीयम' हा इरफानचा सिनेमा येऊन गेला आहे. त्याचाच 'हिंदी मिडीयम 2' सिक्वेल असेल. बॉलिवूड लाईफनुसार, सिनेमाच्या निर्मात्यांनी लंडनमध्ये जाऊन इरफानची भेट घेतली. सिनेमाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्याने कथेला होकार दिला आहे. 

इरफानने सध्यातरी सोशल मिडीयावर त्याच्या आगामी कुठल्याही प्रोजेक्ट विषयी माहिती दिलेली नाही. एका नवीन सिनेमातून इरफान प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हटल्यानंतर त्याच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा होत आहे, असं म्हणायला हरकत नाही. ही गोष्ट नक्कीच इरफानच्या चाहत्यांना सुखावणारी आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrfan Khan ready to come back with new film