esakal | इरफानला कॅन्सर झाल्यावर सगळ्यात पहिले केली होती संजय दत्तने मदत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay dutt irfan khan

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलने संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवत हे पत्र लिहिलं आहे.

इरफानला कॅन्सर झाल्यावर सगळ्यात पहिले केली होती संजय दत्तने मदत

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  संजय दत्तला कॅन्सरचं निदान झाल्याची वाईट बातमी काही दिवसांपूर्वी कळाली. त्यानंतर दररोज त्याच्या आरोग्याविषयी अपडेट्स येत असतात. अशांतच आता दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलने संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवत हे पत्र लिहिलं आहे. त्याने लोकांना विनंती केली आहे की त्यांना त्यांची स्पेस मिळाली पाहिजे. सोबतंच या गोष्टीचा देखील उलगडा केला आहे की जेव्हा इरफान खानला कॅन्सर झाल्याचं कळालं तेव्हा संजय दत्तची रिऍक्शन कशी होती ते.  

हे  ही वाचा:  सोनू सूदकडे दररोज किती लोक मागतात मदत? सोनूने शेअर केलेले आकडे पाहून व्हाल थक्क  

इरफानचा मुलगा बाबिलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'माझी पत्रकारांना विनंती आहे की माझ्या निवेदनाचा अंदाज बांधू नका. मला माहित आहे की हे तुमचं काम आहे मात्र मला हे देखील माहित आहे की आपल्यामध्ये माणुसकी असते. तेव्हा संजू भाई आणि त्याच्या कुटुंबाला थोडी स्पेस द्या. मी इथे एक सिक्रेट सांगू इच्छितो, जेव्हा बाबांना कॅन्सर झाल्याचं कळालं होतं तेव्हा संजू भाई त्या लोकांपैकी एक होते जे हरत-हेने मदत करण्यासाठी पुढे येत होते. बाबांच्या जाण्यानंतरही संजू भाई त्या लोकांपैकी पहिले होते जे आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. मी प्रार्थना करतो की  कृपया त्यांना मिडियाला न घाबरता याच्याशी लढू देत.' 

बाबिलने पुढे लिहिलंय, 'आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथे आपण संजू भाईबद्दल बोलत आहोत. ते टायगर आहेत. एक फायटर आहेत. भूतकाळ आपली ओळख निर्माण करत नाही तर तो आपल्याला सुधरवतो. आणि मला माहित आहे की ही वेळ देखील निघून जाईल आणि संजू बाबा पुन्हा एकदा हिट्स देताना दिसतील.'  

irrfan khan son babil reveals a secret that sanjay dutt was one among who offered help after his fathers death  

loading image
go to top