esakal | सोनू सूदकडे दररोज किती लोक मागतात मदत? सोनूने शेअर केलेले आकडे पाहून व्हाल थक्क
sakal

बोलून बातमी शोधा

sonu sood

सोनू देशातंच हे मदतकार्य राबवत नाहीये तर परदेशात फसलेल्या गरजु लोकांसाठी देखील मदतीचा हात देत आहे.

सोनू सूदकडे दररोज किती लोक मागतात मदत? सोनूने शेअर केलेले आकडे पाहून व्हाल थक्क

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- लॉकडाऊन दरम्यान लोकांसाठी देवदूत बनलेला सोनू सूदने त्याचं मदतीचं कार्य अजुनही सुरु ठेवलं आहे. जो मदतीचा ओघ त्याने प्रवासी मजुरांसाठी सुरु केला होता तो आता जास्त व्यापक बनला आहे. सोनू देशातंच हे मदतकार्य राबवत नाहीये तर परदेशात फसलेल्या गरजु लोकांसाठी देखील मदतीचा हात देत आहे.

हे ही वाचा: कंगनाने रिया चक्रवर्तीवर तिच्या वकिलांबाबत उपस्थित केले प्रश्न, 'जर निर्दोष आहेस तर..'

सोनू सूदला मदतीसाठी दररोज किती लोक संपर्क करतात याचा लेखाजोगा सोनूने गुरुवारी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. जे आकडे त्याने शेअर केले आहेत ते हैराण करणारे आहेत. सोनूने हे आकडे चाहत्यांसोबत शेअर करताना लिहिलंय, '११३७ ईमेल्स, १९००० फेसबुक मेसेज, ४८१२ इंस्टाग्राम मेसेज आणि ६७४१ ट्विटर मेसेज. हे आजचे मदत मागणा-यांचे आकडे आहेत. एव्हरेज आकडे पाहिले तर जवळपास इतक्या रिक्वेस्ट मला दररोज मदतीसाठी येतात. एक माणूस म्हणून हे अशक्य आहे की तुम्ही यापैकी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकाल. मात्र तरीही मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे. ' 

सोनू सूदने या मेसेजच्या शेवटी लिहिलंय, 'मी माफी मागतो जर माझ्याकडून तुमचा मेसेज दुर्लक्षित झाला असेल तर.' सोनूने लॉकडाऊन दरम्यान कित्येत प्रवासी मजुरांना त्याच्या घरी पोहोचवलं होतं. यावर तो एक पुस्तक देखील लिहीत आहे जे लवकरंच चाहत्यांसाठी उपलब्ध होईल.   

sonu sood revealed number how many help requests he gets on daily basis  

loading image
go to top