मृत्यूच्या एक दिवस आधी इरफान बेशुद्धावस्थेतही खूप रडला होता... Irrfan Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irrfan Khan

मृत्यूच्या एक दिवस आधी इरफान बेशुद्धावस्थेतही खूप रडला होता...

इरफान खान(Irrfan Khan) हा नट म्हणजे बॉलीवूडला लाभलेला एक मौलिक हिरा होता असं म्हटलं तर अतिश्योक्ती नक्कीच म्हणता येणार नाही. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं जर त्याला गाठलं नसतं तर कदाचित आज इरफान सारखा कडक अभिनय करणारा अभिनेता नक्कीच आज आपल्यात असता. त्याच्या मृत्यूनंतरही आज त्यानं केलेल्या सिनेमांच्या माध्यमातनं तो आपल्यासोबत नक्कीच असणार आहे. तेही केवळ बॉलीवूडमध्ये नाही तर हॉलीवूडमध्येही त्याचं नाव त्यानं केलेल्या हॉलीवूड सिनेमांच्या माध्यमातनं नक्कीच स्मरणात राहणार आहे. त्याचा मुलगा बाबिलनंही आता बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलीय. अनुष्का शर्मानं निर्मिती केलेल्या 'काला' सिनेमात तो दिसणार आहे. बाबिल अनेकदा आपल्या वडीलांच्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

इरफानची पत्नी सुतापाही अनेकदा त्याच्या आठवणींना उजाळा देत असते. नुकताच इरफानचा ५५ वा वाढदिवस होऊन गेला. त्यानिमित्तानं त्याची पत्नी सुतापानं एका मुलाखतीत त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच्या रात्री काय घडले होते त्याची आठवण सांगितली आहे. ती म्हणाली,''इरफान निपचित पडला होता. पण एक विशिष्ट प्रकारचे भाव त्याच्या चेह-यावर मला दिसत होते. हे असे भाव मी पाहिले होते त्याच्या चेह-यावर ते एखादे गाणे ऐकायची फर्माईश करताना. का कुणास ठाऊक मला त्याक्षणी वाटले की इरफानला नक्की गाणे ऐकायचे आहे''.

हेही वाचा: खल्लास! श्वेता तिवारीचा 'किलर लूक' पाहायला चाहत्यांची उडाली झुंबड...

मी लगेचच,'झूला किने डाला रे','उमराव जान मधील 'अमरैया झूले मोरा सइयां लूं मै बलइयां','लग जा गले फिर ये हसीं रात हो ना हो','आज जाने की जिद ना करो' आणि 'रबींद्र संगीत' अशी त्याच्या आवडीची गाणी लावली. आणि अचानक शांत निपचित पडलेल्या इरफानच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. म्हणजे तो हे सगळं अनुभवत होता,जाता जाता...''. पुढे सुतापा म्हणाली,''मला आनंद आहे की नकळत का होईना त्याच्या शेवटच्या क्षणात त्याची असलेली ती गाणी ऐकायची इच्छा माझ्याकडून पूर्ण झाली''.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top