मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात;'या' आजारानं आहेत त्रस्त, जाणून घ्या हेल्थ अपडेट MIthun Chakraborty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mithun Chakraborty

मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात;'या' आजारानं आहेत त्रस्त, जाणून घ्या हेल्थ अपडेट

बॉलीवूडचे 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty) यांचे चाहते सध्या भलतेच चिंतेत दिसत आहेत,याचं कारण आहे त्यांचा व्हायरल होणारा एक फोटो. मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयात(Hospital) दाखल झाल्याचे संकेत देणारा एक फोटो सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात बेड वर झोपलेले दिसत आहेत. मात्र या फोटोमुळे आता सगळीकडे मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीसंदर्भात अफवा पसरली आहे. रुग्णालयातील मिथुन चक्रव्रती यांचा तो फोटो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. अभिनेत्याला त्या अवस्थेत पाहून त्यांचे चाहते मात्र बेचैन झाले आहेत. पण आता आम्ही या फोटोमागचं सत्य नेमकं काय आहे,मिथुन चक्रवर्तींना नेमकं झालंय काय यासंदर्भात माहिती देणार आहोत.

हेही वाचा: अजान-हनुमान चालिसा वादात भजन सम्राट अनुप जलोटा यांची उडी; म्हणाले...

मिमोह चक्रवर्ती यांनं मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली आहे. त्यानं सांगितलं आहे,''मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोनचा त्रास उद्भवल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्हायरल झालेला फोटो हा रुग्णालयातला आहे,ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती बेशुद्धावस्थेत बेडवर झोपलेले आहेत. पण आता मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर आहे'', असंही मिमोह चक्रवर्तीनं नमूद केलं आहे. ''बंगळुरुमधील रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. ते फीट आहेत'', असंही मिमोहनं म्हटलं आहे.

मिथुन चक्रवर्ती यांची हेल्थ अपडेट समोर आल्यानंतर आता त्यांच्या लाखो चाहत्यांना हायसं वाटलं आहे. त्यांचे चाहते त्यांची प्रकृती उत्तम रहावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपम हझारा यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या फोटोला आपल्या ट्वीटरवर शेअर करीत त्यांची प्रकृती लवकरात लवकर उत्तम होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे.

Web Title: Is Veteran Actor Mithun Chakraborty In Hospital Heres The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top