अजान-हनुमान चालिसा वादात भजन सम्राट अनुप जलोटा यांची उडी; म्हणाले... Anup Jalota | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anup Jalota On Azaan-Hanuman chalisa controversy

अजान-हनुमान चालिसा वादात भजन सम्राट अनुप जलोटा यांची उडी; म्हणाले...

हनुमना चालिसा(Hanuman chalisa) आणि अजान वाद(Azzan Controversy) हा इतका टोकाला गेलाय की यामुळे आता दंगल होतेय की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात भरली आहे. राजकीय नेते मंडळी,साधु-संत यांच्या या विषयावरील मत प्रदर्शनानंतर आता फिल्म इंडस्ट्रीनंही या वादात एन्ट्री केलेली दिसून आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी औरंगाबाद येथाील सभेत पुन्हा मशिदीवरील भोंगे काढून टाकण्यासाठी अल्टिमेटम दिलाय आणि तसं जर झालं नाही तर परिणाम वाईट होतील असं देखील म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय,''जर मशिदींवरील भोंगे काढून टाकले नाहीत तर मनसे कार्यकर्ता मशिदी बाहेर हनुमान चालिसा वाचायला लागतील. आणि यासाठी भोंग्याचीच मदत घेतली जाईल''. महाराज बालकदास यांनी देखील म्हटलं होतं की,'' जर अजान ऐकवण्यासाठी मशिदवर भोंगे लावले जातात तर मग हनुमान चालिसा ऐकवण्यासाठी भोंग्यांचा वापर का केला जाऊ नये''. आता या रंगलेल्या वादात भजन गायक अनुप जलोटा(Anup Jaltoa) यांनी देखील उडी घेत आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा: 7 वर्षानंतर पुन्हा शाहरुख-काजोलची जमणार जोडी,पण...

गोरखपूर येथील एका कार्यक्रमात अनुप जलोटा म्हणाले की, ''आमच्या इथे अजान आणि हनुमान चालिसा दोन्हींना संगीताच्या माध्यमातून सादर केलं जातं. हे दोन्ही देखील ऐकताना खूप श्रवणीय आहेत. जिथे अजानमध्ये संगीताचे सूर वास करुन आहेत तिथे कृष्णाच्या बासरीमधूनही मनमोहक सूर निघतातच की''. अनुप जलोटा पुढे म्हणाले आहेत,''अजान आणि हनुमान चालिसा दोघांचे आपलं असं एक महत्त्व आहे,पण हे ऐकवताना आवाजाची मर्यादा असावी''.

हेही वाचा: Urfi Javed Podcast: ''माझ्यासोबत आणखी वाईट काय घडणार,भीतीच उरली नाही''

अनुप जलोटा म्हणाले आहेत,''मंदिर-मशिद किंवा मग गुरुद्वारा,चर्च काहीही असो,कुठेही देवाची आराधना मोठ्या आवाजात करू नये. कानांना तो आवाज मधुर वाटेल अन् ऐकणाऱ्याला त्याचा त्रास होणार नाही इथपत आवाजाची मर्यादा ठेवावी''. त्यांनी आपलं उदाहरण देताना म्हटलं आहे,''मला भजन गायला आवडतं. पण ते भजन जर मोठ्या आवाजात मी गायला लागलो तर लोकांना त्याचाही त्रास होणारच''.

हेही वाचा: आयुषमान खुरानाची पत्नी म्हणते,'आमच्यासाठी सेक्स एक चांगला वर्कआऊट आहे'

अनुप जलोटा यांनी यु.पी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतूक केलं आहे. योगींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत गोरखपूरचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकल्यामुळे अनुप जलोटा यांनी त्यांचं कौतूक केलं. गेल्या ४० वर्षांपासून आपलं गोरखपूरशी जवळचं नातं राहिलं आहे. त्यामुळे आताचं बदललेलं गोरखपूर इतकं सुधारलं आहे की बाहेरून येणाऱ्याला ते ओळखताही येणार नाही.

Web Title: Anup Jalota On Azaan Vs Hanuman Chalisa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top