इशाचे डर्टी साँग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

‘जन्नत २’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इशा गुप्ताने काही वर्षांतच अनेक चित्रपट केले आहेत. तसेच तिचे अनेक चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचे आहेत. चित्रपटांमधून इशाने अनेक वेळा डान्स किंवा आयटम साँगही केलं आहे. आता ती ‘गेट डर्टी’ या सिंगल गाण्याच्या अल्बममधून दिसणार आहे.

हे गाणे पंजाबी, इंग्रजी रॅप गाणं आहे. गौरव दासगुप्ताने इशिका बक्षी या नव्या गायिकेबरोबर म्हटलेल्या या गाण्यात इशा ठुमके लगावणार आहे. ‘म्युझिक १’ या लेबलच्या गाण्यासाठी काम करण्याच्या अनुभवाबद्दल ती म्हणते, ‘हे करताना खूपच मजा आली.  हे गाणं उन्मादक; पण एनर्जेटिक आहे. प्रदर्शित झाल्यावर सगळीकडे याच गाण्यावर लोक थिरकणार आहेत. या वर्षीचे पहिल्या नंबरचे गाणे ठरेल यात शंका नाही.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isha Gupta Dirty Song Entertainment