'इस्रो'ने दिल्या 'मिशन मंगळ'ला शुभेच्छा!

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू हे प्रमुख भूमिकेत आहेत.

18 जुलैला 'मिशन मंगळ'चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने आपल्या ट्विटर अकाउंटरवरून या चित्रपटाचे कौतुक केले असून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. 'टीम इस्रो' ज्या उत्कटतेने आणि भावनेने काम करते, ते या चित्रपटात दाखविण्यात आले आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि तापसी पन्नू हे प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेची कथा चित्रपट स्वरूपात लोकांसमोर येणार आहे. ही मंगळ मोहिम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी घेतलेले प्रयत्न मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

जगन शक्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच या चित्रपटाची कथादेखील त्यांचीच आहे. निथ्या मेनन, शर्मन जोशी, किर्ती कुल्हारी, संजय कपूर, विक्रम गोखले हे सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO wishes the team of film Mission Mangal