esakal | अफेअरच्या चर्चांनी मुनमुन दत्ता संतापली; म्हणाली, 'भारताची लेक...'
sakal

बोलून बातमी शोधा

अफेअरच्या चर्चांनी मुनमुन दत्ता संतापली; म्हणाली, 'भारताची लेक...'

अफेअरच्या चर्चांनी मुनमुन दत्ता संतापली; म्हणाली, 'भारताची लेक...'

sakal_logo
By
विनायक होगाडे

तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेतील 'बबीता जी' हे पात्र साकारणारी मुनमुन दत्ता अलिकडे चांगली चर्चेत आहे. या मालिकेतील को-स्टार राज अंदकतसोबत तिचं अफेअर आहे, अशा चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये होताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता मुनमुन दत्ता यांनी एक ओपन लेटर लिहून ट्रोल करणाऱ्यांना आणि माध्यमांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना तिने म्हटलंय की, आज मला भारताची एक मुलगी म्हणवून घेताना लाज वाटतेय. मुनमुन दत्ता यांचं अफेअर आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत सुरु असलेली आधारहिन चर्चा यामुळे व्यथित झालेल्या मुनमुन दत्ता यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मगाशीच इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने खासगी आयुष्याविषयी चर्चा करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

हेही वाचा: महिलांना उच्चशिक्षणाची परवानगी; मात्र 'हिजाब'बाबत तडजोड नाही: तालिबान

तिने म्हटलंय की, मला तुमच्याकडून अधिक चांगल्या वर्तनाची अपेक्षा होती. मात्र, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जी घाण पसरवली आहे, त्यातून हे सिद्ध होतंय की, आपण तथाकथित 'सुशिक्षित' असूनही समाजाला मागे घेऊन जाणारा भाग आहोत. तुमच्या मनोरंजनासाठी महिलांना सातत्याने लज्जास्पद वर्तवणुक दिली जात आहे. तुमच्या या मजेमुळे एखाद्यावर काय ओढवतं, आणि त्याच्यावर काय परिणाम होतात, याची आपल्याला कधीच चिंता वाटली नाही. मी लोकांचं गेल्या 13 वर्षांपासून मनोरंजन करत आहे मात्र, लोकांना मला दुखवायला 13 मिनिट देखील लागले नाहीत.

पुढे तिने म्हटलंय की, पुढच्या वेळी तुमचे शब्द वापरताना हा विचार जरुर करा की, कुणी इतकं नैराश्यात जाऊन आत्महत्त्या करण्याचा विचार करेल का? आज मला स्वत:ला भारताची मुलगी म्हणवताना लाज वाटतेय.

हेही वाचा: राधिकाच्या 'स्कर्ट आणि पॉकेट ब्रा'ची चर्चा, फोटो व्हायरल

पुढे तिने माध्यमांना आणि माध्यमकर्मींना देखील झापलं आहे. तिने म्हटलंय की, मीडियात काम करणाऱ्यांना एखाद्याच्या आयुष्याबद्दल कपोलकल्पित कथा रचण्याचा अधिकार कुणी दिला आहे? तुमच्या या बेजबाबदार वर्तनामुळे एखाद्याच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? तुमच्या टीआरपीसाठी तुम्ही एखाद्या मृतांच्या नातेवाईकांसमोर देखील कॅमेरे नाचवायला मागे-पुढे पाहत नाही. तुमच्या लेखांमधून, हेडलाईन्समधून तुम्ही सनसनाटी पसरवण्यासाठी काही करता, मात्र त्याचा एखाद्याच्या आयुष्यावर जो परिणाम होतो, त्याची जबाबदारी घेण्याची तुमची तयारी आहे का? जर नसेल तर तुम्ही लज्जास्पद आहात.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणारा राज अंदकत आणि बबीता जी पात्र साकाराणारी मुनमुन दत्ता हे एकमेकांना डेट करत असल्याची बातमी आली होती. या बातमीनंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे. या दोघांमध्ये ९ वर्षांचं अंतर आहे, त्यावरुनही त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

loading image
go to top