बाळ ठाकरे साकारताना नाही घेता आला आनंद  - नवाजुद्दीन

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

'बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका साकारताना आपल्याला इतर आनंद घेता आला नाही' असे मत बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने व्यक्त केले आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारित चित्रपटात नवाजुद्दीन याने काम केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर त्याने असे म्हटले आहे.

मुंबई - 'बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका साकारताना आपल्याला इतर आनंद घेता आला नाही' असे मत बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने व्यक्त केले आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर आधारित चित्रपटात नवाजुद्दीन याने काम केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर त्याने असे म्हटले आहे.

बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे म्हणणे आहे की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पात्र पडद्यावर साकारणे हे खुप आव्हानात्मक होते. त्यांचे पात्र साकारणे हे खुप कठीण काम होते. त्यामुळे ते पात्र करताना काळजी घेणे गरजेचे होते आणि त्या पात्राला न्याय देण्यासाठी आपण खुप काळजीपूर्वक काम केले आहे, त्यामुळे मला चित्रीकरणादरम्यान त्यांची भुमिका साकारताना योग्य तो आनंद घेता आला नाही.

एकवेळेस मी खुप उदास झालो होतो. तसेच, मी बाकी चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटासाठी खुप मेहनत घेतली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त कष्ट मी या भुमिकेसाठी घेतले आहेत, असेही नवाजुद्दीनने यावेळी स्पष्ट केले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना नवाजुद्दीनने सांगितले की, त्यांचे व्यक्तिमत्व हे पारदर्शक होते. त्यांच्यात सामान्य माणसाला ताकदवान बनवण्याची शक्ती होती.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर चित्रपट येत असून त्यामध्ये, नवाजुद्दीनने बाळासाहेब ठाकरे यांची मुख्य भुमिका साकारली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे, तर या चित्रपटाची निर्मीती संजय राऊत यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: it-was-lifetime-experience for nawazuddin siddiqui to portray bal thackeray in film thackeray