Video:प्रत्येक ठिकाणी हातात छोटंसं रोपटं घेऊन का फिरताना दिसतो जॅकी; मजेशीर आहे या स्पाईडर प्लांटची कहाणी Jackie Shroff | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jackie Shroff

Video:प्रत्येक ठिकाणी हातात छोटंसं रोपटं घेऊन का फिरताना दिसतो जॅकी; मजेशीर आहे या स्पाईडर प्लांटची कहाणी

Jackie Shroff Video: सुभाष घईंच्या बर्थ डे पार्टीत सलमान खानपासून ऐश्वर्या राय बच्चन,अनिल कपूर,शत्रुघ्न सिन्हा,कार्तिक आर्यन पर्यंत अनेक स्टार्स सामिल झाले होते.

याच पार्टीत जॅकी श्रॉफही पोहोचला होता. जॅकी श्रॉफचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो हातात एक स्पाइडर प्लांट घेऊन दिसत आहे.

आता लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की जॅकीच्या हातात हे प्लांट का आहे? ते प्लांट त्यांनी सुभाष घईला गिफ्ट केलं का? आता हे पहिल्यांदा घडत नाहीय जिथे जॅकीच्या हातात हे प्लांट दिसत आहे.

याआधी देखील आशा भोसलेंची नात जनाई भोसलेच्या पार्टीत जॅकीच्या हातात हे सेम प्लांट दिसलं होतं. खरंतर या प्लांटचं आणि जॅकीचं खास कनेक्शन आहे,ज्यामागे खास कहाणी देखील आहे. चला जाणून घेऊया.

हेही वाचा: Suhana Khan नं शेअर केले हॉट फोटो पण लाइमलाइट लुटली पप्पा शाहरुखच्या कमेंटनं..मुलीची पोलखोल करत म्हणालाय..

जॅकी श्रॉफच्या गळ्यातील प्लांट वाल्या माळेनं सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले आहे. पर्यावरणाचं संवर्धन आणि प्रदूषण कमी करण्याचा एकमात्र पर्याय झाडांची लागवड करणं हाच आहे यावर जॅकी श्रॉफचा ठाम विश्वास आहे. हेच कारण आहे जिथे इतर कलाकार स्टायलिश आणि फॅन्सी अॅक्सेसरीज घालणं पसंत करतात तिथे जॅकी एका छोट्याशा पॉटमध्ये लावलेल्या प्लांटला गळ्यात घालणं पसंत करतात आणि सगळीकडे न लाजता तसंच जातात.

जॅकीला स्पाइडर प्लांट खूप आवडतं आणि ते आपल्या गाडीतही हे प्लांट ठेवतात. जॅकीचं म्हणणं आहे की कारमधील टॉक्सिक हवेपासून संरक्षण होण्यासाठी या स्पाइडर प्लांटची नितांत आवश्यकता आहे.

हेही वाचा: Pathaan रिलीज होतोय अन् चर्चा Don 3 ची रंगलीय..शाहरुख उद्या म्हणे डबल धमाका करणार..जाणून घ्या

जॅकी श्रॉफनं यासंदर्भात मनमोकळा संवादही साधला आहे. जॅकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात तो बोलताना दिसत आहे की,''झाडं लावून मी जगावर उपकार करत नाहीय. सगळ्यांचं काम आहे झाडं लावण्याचं..नाही लावायचं तर जळून खाक व्हा''.

''तेच होणार आहे. मला माझ्या मुलाच्या मुलाचा पण विचार करायचा आहे. माझे तर आता चार दिवस उरलेयत. पण पुढची पिढी जन्मास येणार आहे त्याची चिंताही आहे मला. माझा टायगर आहे आणि त्याचा देखील एक छोटा टायगर येईलटट.

टटतुम्हाला देखील मुलं असतील,किंवा जन्माला येणार असतील. तर ही गोष्ट समजून घ्या,त्यांच्यासाठी आपल्याला झाडं लावायची आहेत..मला फार बोलता येत नाही..पण जेवढं आलं बोलता ते मी शेअर केलं''.

हेही वाचा: ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

जॅकीला जेव्हा या स्पाइडर प्लांट विषयी विचारलं तेव्हा तो म्हणाला की,''हे प्लांट खूप युनिक आहे, ते हवेतील विषारी घटक हटवतात आणि त्या बदल्यात आपल्याला ऑक्सिजन देतं''

. २०१९ मध्ये एका मुलाखतीत जॅकी म्हणाला होता की, ''काहीदिवसांपूर्वीच मला कळालं की या प्लांटला स्वतःच्या जवळ ठेवायला हवं. ते खूप गरजेचं आहे''.

''मी या प्लांटला कस्टम मेड पॉटमध्ये लावलं आहे,जे मला माझ्या मित्रानं गिफ्ट केलं आहे. मी या झाडाला रोज पाणी घालतो,आणि माझ्या गळ्यात लटकवून चालतो. पण लोक यापेक्षा मोठ्या आकाराचं प्लांट खरेदी करून कारमध्ये ठेवू शकतात''.

''किंवा घरात डेकोरेटिव्ह पीस म्हणूनही ठेवू शकतात. हे महागड्या स्टॅच्यू किंवा आर्टपीस पेक्षा अधिक उत्तम राहिल''.