Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचे फोटो पाहून जग्गू दादालाही राहवेना! कमेंटची रंगली चर्चा..

Amruta Fadnavis
Amruta FadnavisEsakal

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नेहमीच चर्चा असते. कुण्या कलाकरांचाही इतका चाहता वर्ग नसेल तितका अमृता फडणवीस यांचा आहे. त्यांची गाणी, त्यांची फॅशन स्टाईल अशा बऱ्याच गोष्टीमुळे त्या नेहमीच सोशल मिडियावरही चर्चेत असतात. त्याचबरोबर अनेक वेळा त्यांना यामुळे ट्रोलही होत असतात.

Amruta Fadnavis
Urfi Javed video: 'चित्रा ताई ती पुन्हा'... उर्फी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी अतरंगी फॅशनमध्ये! नेटकरी थक्क

नेटकरी त्याच्या फोटोंना किंवा व्हडिओला नेहमीच ट्रोल करत असतात तर काही त्याचे कौतुकही करत असतात. नुकतिच त्याची गाणीही आली ती काहींना आवडली तर काहींनी पुन्हा त्यांना ट्रोल केलं होत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 'कोक स्टुडीओ भारत' या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. या फोटोत त्यांनी गुलाबी रंगाचा टॉप आणि त्यावर कलरफूल पँट परिधान केली होती. या फोटोत त्या खुप कुल आणि स्टायलिश दिसत आहेत.

Amruta Fadnavis
Kangana On Sid-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा देतांना कंगनाचा आलियाला अप्रत्यक्ष टोमणा..

मात्र त्याचा हा लूक नेटकऱ्यांना आवडलेला दिसत नाहिये. त्यांनी कमेंट करत अमृता यांच्यावर निशाणा साधला. 'मॅडम, असे कपडे घालणे शोभत नाही तुम्हाला,, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांच्या अर्धागिनी आहात...', 'काय कपडे आहेत हे फॅशनच्या नावाखाली निट तरी करा फॅशन... जरा तरी शोभून दिसेल असे करा ...', 'फॅशन सेन्स खूप वाईट आहे.', अशा अनेक कमेंट त्याच्या पोस्ट आल्या आहेत.

Amruta Fadnavis
Bigg Boss 16: आवाज खाली! शालिन अन् स्टॅनमध्ये पुन्हा राडा कारण टिनाचं! पत्रकारांसमोरच सुरु...

मात्र यावेळी चर्चा रंगली ती जॅकी श्रॉफ यांच्या कमेंटची. त्यांनी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. जॅकी श्रॉफ यांनी या पोस्टवर टाळ्या वाजवल्याचा इमोजी कमेंट केला आहे. त्याच्या या कमेंटलाही नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com