Bigg Boss 16: आवाज खाली! शालिन अन् स्टॅनमध्ये पुन्हा राडा कारण टिनाचं! पत्रकारांसमोरच सुरु...

Bigg Boss 16
Bigg Boss 16Esakal

'बिग बॉस 16' च्या फिनाले आता अगदी जवळ आला आहे. या सीझनला टॉप-5 फायनलिस्ट मिळाले आहेत. शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टेन, शालीन भानोत आणि अर्चना गौतम यांच्यापैकी कोण 'बिग बॉस 16' ची विजेती ठरणार हे तर 12 फेब्रुवारीला कळणार आहे.

पण त्याआधी या पाच फायनलिस्टला 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या मिडियाच्या टोकदार आणि अवघड प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. मात्र यादरम्यान शालीन भानोत आणि एमसी स्टेन यांच्यात पुन्हा राडा होणार आहे. त्याची झलक निर्मात्यांनी नव्या प्रोमोमध्ये दाखवली आहे.

Bigg Boss 16
Rakhi Sawant: तो मला मारायला आला ', नवऱ्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर राखीची प्रतिक्रिया..

त्याच झालं असं की, एका पत्रकाराने शालीनला विचारलं की तुझा मास्टरस्ट्रोक काय होता, टीनासोबतचं नातं किंवा तुझं ब्रेकअप. शालीन या प्रश्नाचे उत्तर देत असताना स्टेन मीडियाकडे काही हातवारे करतांना दिसतो. ही गोष्ट शालीनला खटकते आणि तो स्टॅनला रागवतो, मी तुझ्याशी बोलतोय का? मला बोलू दे.'

जेव्हा सर्व पत्रकार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतात तेव्हा पुन्हा शालीन आणि एमसी स्टॅनमध्ये भांडण होते. प्रकरण इतकं वाढतं की शिवालाच मदतीला यावं लागतं. स्टॅन नम्रपणे शालीनला त्याच्यासोबत बळीचे कार्ड न खेळण्यास सांगतो. शालीन म्हणतो की तो व्हिक्टिम कार्ड खेळत नाही. जेव्हा शालीन स्टॅनवर ओरडतो तेव्हा स्टॅन त्याला सांगतो की त्याने त्या ओरडयला हवं होतं, ज्याने त्याला व्हिक्टिम कार्ड प्ले करायला सांगितले होते.

Bigg Boss 16
Urfi Javed video: 'चित्रा ताई ती पुन्हा'... उर्फी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी अतरंगी फॅशनमध्ये! नेटकरी थक्क
Bigg Boss 16
Bigg Boss 16 Winner: शिवचं स्वप्न भंगणार? बिग बॉस 16 चा विजेता होणार 'हा' स्पर्धक

यााधीही त्यांदोघांमध्ये बराच वाद झाला आहे. पहिले झालेल्या वादाचं कारणंही टिनाचं होती. आताही टिनावरुन विचारलेल्या प्रश्नामुळेच दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसतयं. 'बिग बॉस 16' चा ग्रँड फिनाले 12 फेब्रुवारीला आहे. शोमध्ये सध्या 5 स्पर्धक आहेत आणि आता फक्त विजेता बनवण्यासाठी वोटिंग केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com