Ayesha Shroff: जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ यांची फसवणूक! 58 लाखाला गंडा घातल्याचा दावा..

आयशा श्रॉफयांनी सांताक्रूझ पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Jackie Shroff's wife Ayesha cheated of Rs 58.53 lakh; files police complaint
Jackie Shroff's wife Ayesha cheated of Rs 58.53 lakh; files police complaint sakal

Ayesha Shroff: बॉलीवुड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आणि निर्मात्या आयशा श्रॉफ यांची फसवणूक झाली असून त्यांना 58.53 लाखाला गंडा घातल्याचा दावा त्यांनी केला आहे. यांसादर्भात त्यांनी सांताक्रूझ पोलिसा ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेश श्रॉफ यांनी दावा केला आहे की, त्यांची 58.53 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी अॅलन फर्नांडिस याच्याविरुद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 408, 420, 465, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

(Jackie Shroff's wife Ayesha cheated of Rs 58.53 lakh; files police complaint)

Jackie Shroff's wife Ayesha cheated of Rs 58.53 lakh; files police complaint
Ameesha Patel Birthday: माझा बाप भ्रष्टाचारी आहे.. म्हणत, अमीषानं बापाशीच घेतलं होतं वैर.. काय आहे प्रकरण?

आरोपी अॅलन फर्नांडिस याने टायगर श्रॉफच्या 'एमएमए मॅट्रीक्स' या कंपनीत घोटाळा केला आहे. 'एमएमए मॅट्रीक्स' ही टायगरची जीम कंपनी आहे. या कंपनीमध्ये 20 नोव्हेंबर 2018 रोजी डायरेक्टर ऑफ ऑपरेषन अॅलनची नियुक्ती केली होती.

पण टायगर आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्याची आई आयेशा या कंपनीचा सर्व कारभार पाहत आहेत. अॅलन फर्नांडिस याला 'एमएमए मट्रीक्स'मध्ये येणाऱ्या लोकांना मार्षल आर्टचे प्रशिक्षण देण्याकरीता ठेवले होते. त्यासाठी त्याला महिना 3 लाख रुपये मासिक वेतन दिले जायचे.

Jackie Shroff's wife Ayesha cheated of Rs 58.53 lakh; files police complaint
Vanita Kharat: मला काहीच फरक पडत नाही, पण.. लठ्ठपणावर वनिता खरात जरा स्पष्टच बोलली..

पण त्याने या कंपनीने त्याने 58 लाखांचा घोटाळा केला आहे. झाले असे की,अॅलन याने 'एमएमए मट्रीक्स' तर्फे भारतात आणि भारताबाहेर अशा एकूण 11 स्पर्धा  आयोजन करण्याकरीता ज्यादा रक्कम घेतली.'

'तसेच जीममधील मार्षल आर्टचे शिक्षण घेत असलेल्या लोकांची डिसेंबर  2018 ते जानेवारी 2023 पर्यंत जमा झालेली फी ही कंपनीच्या बँक खात्यात जमा न भरता ती स्वतःच्या खात्यात भरली. अंदाजे 58 लाख 53 हजार 591 रुपये इतकी ही रक्कम आहे.

तसेच अॅलनने कंपनीचे  बनावट लेटर हेड तयार करून त्यावर स्वाक्षरी करून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला, असाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com