जॅकी भगनानीसह, फोटोग्राफरवर बलात्काराचा आरोप; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Jackie Bhagnani

जॅकी भगनानीसह, फोटोग्राफरवर बलात्काराचा आरोप; गुन्हा दाखल

मुंबई - बॉलीवूड विश्वात खळबळ उडवून देणारी एक घटना घडली आहे. प्रसिध्द अभिनेता जॅकी भगनानीच्या (jackky bhagnani) सहित एका फोटोग्राफरवर महिलेचा बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोठी चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु झाली आहे. सोशल मीडियावरही (social media) या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या फोटोग्राफरचे नाव कॉलस्टन ज्युलियन (collestain jullien) असा आहे. या दोघांसहित आणखी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (jackky bhagnani 8 others accused of rape and molestation fir lodged by former model)

थलाईवी (Thaivi) चित्रपटाचे निर्माते विष्णू वर्धन इंदुरी, क्वान एंटरटेनमेंटचे को फाउंडर अनिर्बान दास ब्लाह यांचाही त्यात संशयित आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच त्या एफआयआर कॉपीमध्ये कृष्ण कुमार, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकुर आणि गुरुज्योत सिंग यांचाही समावेश आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

फिर्यांदीनं केलेल्या तक्रारीनुसार भगनानी, फोटोग्राफरसह आणखी ८ जणांवर बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या २८ वर्षांच्या मॉडेलनं म्हटलं आहे की, 2014 ते 2019 दरम्यान आपल्यावर शाररिक अत्याचार करण्यात आले आहेत. आरोपपत्रामध्ये जॅकी भगनानीनं आपले शोषण केल्याचे म्हटले आहे तर निखिल कामत यानं सांताक्रुझ मधील एका हॉटेलमध्ये शोषण केल्याचे तिनं सांगितले आहे.

हेही वाचा: त्या रात्री नेमकं काय झालं? जामिनावर सुटलेल्या करणचं स्पष्टीकरण

हेही वाचा: बॉलीवूडमध्ये इनसायडर नाही, रति अग्निहोत्रींचा मुलगा म्हणाला...

पीडितेनं फोटोग्राफर कोलस्टन ज्युलियनवरही अनेक आरोप केले आहेत. त्या मॉडेलचे म्हणणे आहे की, मुंबई मध्ये ती अभिनेत्री होण्यासाठी आली होती. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या बहाण्यानं माझ्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: Jackky Bhagnani 8 Others Accused Of Rape And Molestation Fir Lodged By Former

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..