Money Laundering Case : जॅकलिनने केला पक्षपाताचा आरोप; नोरा फतेहीचे नाव घेत म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez Latest News

Money Laundering Case : जॅकलिनने केला पक्षपाताचा आरोप; फतेहीचे नाव घेत म्हणाली...

Jacqueline Fernandez Latest News अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिने कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मौन सोडले. ‘सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या सेलिब्रिटींना साक्षीदार बनवले आहे. तर मला आरोपी केले आहे’, असे जॅकलिनने म्हटले आहे. अपील प्राधिकरणासमोरील याचिकेत जॅकलिनने हे सांगितले आहे.

मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतलेली नोरा फतेही (Nora Fatehi) आणि इतर सेलिब्रिटी आरोपी असताना साक्षीदार बनवल्याचे जॅकलीनने सांगितले. ईडीने २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez) आरोपी म्हणून नाव दिले आहे.

हेही वाचा: Rashmika Mandanna : पुष्पाच्या श्रीवल्लीला बॉलिवूडमधून मिळाली वाईट बातमी

एप्रिलमध्ये ईडीने पीएमएलएअंतर्गत ७.२७ कोटींचा निधी तात्पुरते संलग्न केले होते. तसेच १५ लाखांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर ईडीने एका निवेदनात म्हटले होते की, सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कारवायांमधून मिळालेल्या रकमेपैकी जॅकलिन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता. त्याने सहआरोपी पिंकी इराणीच्या माध्यमातून अभिनेत्रीला या भेटवस्तू दिल्या होत्या.

जॅकलीन म्हणाली की, नेहमीच तपास यंत्रणांना सहकार्य केले आहे. आजपर्यंत सर्वजण समन्सवर हजर झाली. सर्व माहिती ईडीकडे सोपवली आहे. मात्र, या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे समजण्यात एजन्सी अपयशी ठरली आहे. मुख्य आरोपी चंद्रशेखरने अवलंबलेल्या पद्धतीची बळी ठरली आहे.

Web Title: Jacqueline Fernandez Actress Nora Fatehi Money Laundering Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..