Rashmika Mandanna : पुष्पाच्या श्रीवल्लीला बॉलिवूडमधून मिळाली वाईट बातमी; चित्रपट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika Mandanna Film News

Rashmika Mandanna : पुष्पाच्या श्रीवल्लीला बॉलिवूडमधून मिळाली वाईट बातमी

Rashmika Mandanna Film News ॲक्शन हिरो टायगर श्रॉफचा (Tiger shroff) चित्रपट ‘स्क्रू धीला’ प्रदर्शित होणार होता. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाउसच्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शितही झाला होता. परंतु, आता बातमी येत आहे की हा चित्रपट वर्षभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. या चित्रपटात पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दिसणार आहे. शशांक खेतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते.

रश्मिका मंदानाकडे सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू, रणबीर कपूरसोबत पशु आणि अमिताभ बच्चनसोबत गुडबाय हे सिनेमे आहेत. मात्र, आता या यादीतून स्क्रू ढीलाचे नाव सध्यातरी बाहेर झाले आहे. साउथमध्ये तिच्या ‘पुष्पा २’ चित्रपटावर काम सुरू झाले आहे. मात्र, बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger shroff) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा सध्या तरी पूर्ण होताना दिसत नाही.

हेही वाचा: Raju Srivastav : राजू श्रीवास्तवबद्दल डॉक्टर म्हणाले; बरा होईल, पण...

चित्रपटाला उशीर होण्यामागे तारखेचा मुद्दा असल्याचे सांगण्यात येत आहे. धर्मा प्रॉडक्शन टायगर श्रॉफसोबत आणखी एका चित्रपटावर काम करीत असल्याचे बोलले जात आहे. रश्मिका मंदानाची बॉलिवूड लाइनअप खूपच मजबूत आहे. कारण, तिच्याकडे तीन चित्रपट आहेत. हेच कारण आहे की सध्या ती बहुतांश वेळा मुंबईत दिसते.

रश्मिका मंदानाने २०१६ मध्ये किरिक पार्टी या चित्रपटाद्वारे कन्नडमध्ये पदार्पण केले. तिच्या लोकप्रिय दक्षिण चित्रपटांमध्ये अंजनी पुत्र (२०१७), गीत गोविंदम (२०१८), यजमान (२०१८), सरिलेरू नीकेव्वरू (२०२०), भीष्म (२०२०), पोग्रू (२०२१) आणि पुष्पा या चित्रपटांचा समावेश आहे.

Web Title: Rashmika Mandanna Tiger Shroff Movie Bollywood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..