Jacqueline Fernandez: मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन फसणार? आज निकाल... Money Laundering case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez bail hearing in money laundering case ed sukesh chandrashekhar

Jacqueline Fernandez: मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन फसणार? उद्या निकाल..

Jacqueline Fernandez: मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन फर्नांडिस संदर्भात कोर्ट आज काय निकाल देतो याकडे सगळयांचे लक्ष लागून राहिले आहे. दिवाळी आधी कोर्टाने जॅकलिनला २०० करोडची अफरातफर केल्या प्रकरणात १० नोव्हेंबर पर्यंत वेळ दिला होता. गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी म्हणजे आज पटियाला कोर्टात या केस संबंधात सुनावणी सुरु होती. आज या प्रकरणावर कोर्ट निर्णय देईल असं वाटत असताना आता हा निकाल उद्यावर गेला आहे. (Jacqueline Fernandez bail hearing in money laundering case ed sukesh chandrashekhar)

हेही वाचा: Malaika Arora: अर्जुन-मलायका बोहल्यावर?, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण...

ईडीने कोर्टात जॅकलिनच्या जामिन याचिकेचा विरोध केला होता. ईडीचं म्हणणं होतं की अभिनेत्रीनं चौकशी दरम्यान सहकार्य केलं नाही. तसंच,संबंधित पुरावे आल्यानंतर जॅकलिननं काही गोष्टींची कबुली देखील दिली आहे. ईडीनं हे देखील सांगितलं की जॅकलिनला माहित होतं की सुकेश चंद्रशेखर हा पैशांची अफरातफर करत आहे. त्याच्याविषयी माहित असून देखील ती शांत राहिली आणि त्याच्याकडून महागडे गिफ्ट्स घेत राहिली.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: कोण आहे बिग बॉस मराठीच्या घरातील 'देवदास'? तेजस्विनीनं केलं जाहीर...

मनी लॉन्ड्रिंग केससंदर्भात आज निकाल असल्यामुळे जॅकलिननं पटियाला कोर्टात हजेरी लावली आहे. एनआईए न्यायमूर्ती शैलेंद्र मलिक यांच्यासमोर मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात सुनावणी पार पडेल. आता कोर्टाचा निर्णय जॅकलिनच्या बाजूने लागणार की ईडीच्या बाजूने हे लवकरच कळेल.

जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशची खास असलेल्या पिंकी ईराणीला देखील आज १० नोव्हेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश मिळालेले होते. माहितीनुसार,ईडीच्या वकीलांनी कोर्टात म्हटलं आहे की,आम्ही आरोपी लीना म्हणजे सुकेशची पत्नी हिच्याकडे या प्रकरणातील सर्व दस्ताऐवज सोपवले आहेत. तर कोर्टानं वेळ न दवडता सगळ्यांना दस्ताऐवज कोर्टात जमा करायला सांगितले आहे.

हेही वाचा: Big Boss 16: अर्ध्या रात्री बिग बॉसच्या घरातून हाकललं अर्चना गौतमला, चर्चेला उधाण...

कोर्टात सुनावणी दरम्यान जॅकलिनच्या वकीलांनी सांगितले की ,तिनं केस प्रकरणात पूर्ण सहकार्य केलं. याव्यतिरिक्त ईडीनं जॅकलिनवर देश सोडून पळून जाण्याचा आरोप लावला आहे,यात काहीच तथ्य नाही. जॅकलिनच्या वकीलांचे म्हणणे आहे की तिनं स्वतःच कोर्टात सरेंडर केलं , कोर्टानं अंतरिम जामीन दिला ,पण तरीदेखील ईडी तिला त्रास देत आहे.

हेही वाचा: Brahmastra च्या ओटीटी रीलिजमुळे 'ब्रह्मास्त्र 2' च्या कास्टचं सीक्रेट झालं ओपन; समोर आली दोन मोठी नावं

मनी लॉन्ड्रिंग केसच्या सुनावणी दरम्यान ईडीनं सांगितलं की,या प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे. ईडी सतत जॅकलीनच्या जामीनाला विरोध करताना दिसत आहे. ईडीच्या वकीलानंतर आता जॅकलिनचे वकील आपला जबाब नोंदवत आहेत. आता समोर आलेल्या वृत्तानुसार,या प्रकरणात आता कोर्ट उद्या निर्णय देणार आहे.