esakal | जॅकलिनवर आली तोंड लपवण्याची वेळ (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

जॅकलिनवर आली तोंड लपवण्याची वेळ (व्हिडिओ)

बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमे देणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसवर कपड्याने चेहरा लपवण्याची वेळ आली आहे. नुकतीच जॅकलिन कपड्याने चेहरा लपवताना दिसली.  सोशल मीडियावर जॅकलिनचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जॅकलिनवर आली तोंड लपवण्याची वेळ (व्हिडिओ)

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमे देणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसवर कपड्याने चेहरा लपवण्याची वेळ आली आहे. नुकतीच जॅकलिन कपड्याने चेहरा लपवताना दिसली.  सोशल मीडियावर जॅकलिनचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जॅकलिन या व्हिडीओमध्ये पिंक रंगाच्या कपड्याने चेहरा लपवताना दिसतेय.  जॅकलिनचा हा व्हिडीओ बघून तिचे फॅन्स चांगलेच हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ बघून अनेक तर्क-विर्तक लावण्यात येत आहेत.
 

दरम्यान, मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात करणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने 2006 मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. 2009 मध्ये जॅकलिन एका मॉडेलिंग शोसाठी भारतात येण्याचे निमित्त झाले आणि ती इथलीच होऊन गेली. अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या अलादिन या चित्रपटासाठी तिने ऑडिशन दिली आणि हा चित्रपट तिला मिळाला.

loading image