
मुंबई - बॉलीवूडची ब्युटी क्वीन (bollywood beauty queen) म्हणून जॅकलीन (Jacqueline Fernandez) ही तिच्या हटके अंदाजासाठी प्रख्यात आहे. बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून तिनं आपल्या नावाचा ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. अनेक मोठमोठ्या सेलिब्रेटींबरोबर तिनं काम केलं आहे. त्यात ती यशस्वीही झाली आहे. सध्याच्या घडीला तिच्याकडे मोठ्या बॅनरचे चित्रपटही आहेत. आगामी काळात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (akshay kumar), सलमान खान (salman khan)यांच्याबरोबरही ती दिसणार आहे. आपल्या सामाजिक उपक्रमांसाठीही जॅकलीन चर्चेत असते. सोशल मीडियावर जॅकलीनच्या नावाचा बोलबाला असल्याचे दिसून आले आहे.
सध्या जॅकलीन चर्चेत आली आहे ते तिच्या व्हिडिओमुळे. आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. जॅकलीननं आपल्या योलो (यू ओनली लिव वन्स) फाउंडेशन आर्मी डे ऑफ एक्शनची एक झलक शेअर केली आहे. त्याला नेहमीप्रमाणे तिच्या फॅन्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. 'द वेलफेयर ऑफ स्ट्रे डॉग्स' आणि नंतर 'द फेलिन फाउंडेशन कम्युनिटी'ला जॅकलीनने भेट दिली आहे. तिनं 'योलो आर्मी इन एक्शन' चा एक व्हिडिओ अभिनेत्रीने आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.
व्हिडिओ मध्ये योलोची संपूर्ण टीम दिसते आहे. त्यांनी भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी काम केले आहे. त्यांना आधार देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जॅकलीन स्वयंसेवकांच्या टीमसोबत रस्त्यावर उतरली असून भटक्या कुत्र्यामांजराची काळजी घेताना दिसते आहे. योलोच्या माध्यमातून, जॅकलीनने मुंबई आणि पुणे पुलिस दलांना फेस मास्क दिले आहेत. या काळात लहान मुलांची मदत, तसेच गरजूंसाठी भोजन सेवा, योग यांच्यासोबत बरेच काही करत आहे. जॅकलीनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, जॅकलीनकडे 'सर्कस', 'भूत पुलिस', 'किक 2', 'राम सेतु', 'अटैक' आणि 'बच्चन पांडे' सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.