Jacqueline Fernandez : जॅकलीन पुन्हा सुकेशच्या नावाने झाली ट्रोलिंगची शिकार; युजर्स म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez Latest News

Jacqueline Fernandez : जॅकलीन सुकेशच्या नावाने ट्रोलिंगची शिकार; युजर्स म्हणाले...

Jacqueline Fernandez Latest News बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस २०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे सतत चर्चेत असते. जॅकलीन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरशी संबंध होते. यामुळे अभिनेत्रीची अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली जॅकलीन फर्नांडिस या प्रकरणामुळे दररोज ट्रोल होत आहे. अलीकडेच ही अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलिंगची शिकार झाली.

जॅकलीन फर्नांडिस अलीकडे वर्सोवा बीच क्लीन अप ड्राइव्हचा एक भाग बनली. यावेळी जॅकलीन फर्नांडिसने समुद्रकिनारी पडलेला कचरा साफ केला. टीम तिच्यासोबत या कामात गुंतली होती. जॅकलीन फर्नांडिसने क्लीन अप ड्राईव्हचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आणि लोकांनी तिला ट्रोल केले.

कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी जॅकलीन फर्नांडिसला खूप कमेंट्स दिल्या. एकाने कमेंट केली की, मी सात चमत्कार ऐकले होते आणि मी नुकतेच ८ वे पाहिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर युजरने कमेंट केली, पब्लिसिटी स्टंट. एका व्यक्तीने जॅकलीनच्या या कृत्याचे वर्णन प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

जॅकलीनला ट्रोल करीत एका युजरने लिहिले, हा सुकेशचा टी-शर्ट आहे का? तर दुसऱ्याने लिहिले, सुकेश कसा आहे? तिसऱ्याने व्हिडिओवर टिप्पणी केली की, पैसा सुकेश देणार का? जॅकलीन फर्नांडिसशिवाय नोरा फतेहीलाही २०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे.