Bela Bose: जय संतोषी माँ फेम अभिनेत्री बेला बोस यांचं निधन, १९८० चा काळ गाजवला

बेला यांनी त्यांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते
bela bose, jay santoshi maa, bela bose passed away
bela bose, jay santoshi maa, bela bose passed awaySAKAL

Bela Bose Passed Away: सिनेमा जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे निधन झाले आहे. दिवंगत अभिनेत्री बेला यांनी २० फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला... त्या ७९ वर्षांच्या होत्या.

बेला यांनी त्यांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते. बेला बोस या एक यशस्वी डान्सर सुद्धा होत्या.

त्यांनी शास्त्रीय मणिपुरी नृत्य प्रकाराचे प्रशिक्षणही घेतले होते. 'शिकार', 'जीने की राह' आणि 'जय संतोषी मां' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी बेला यांना ओळखले जाते.

( Jai Santoshi Maa fame actress Bela Bose passed away)

bela bose, jay santoshi maa, bela bose passed away
Ved Movie: १० वर्ष गायब कुठे होतीस? या प्रश्नावर Genelia Deshmukh ने दिलेल्या उत्तराने सर्वांची बोलती बंद

बेला बोस यांचा जन्म कोलकात्याच्या एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे वडील कापड व्यापारी होते तर आई गृहिणी होती. त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आली जेव्हा त्यांच्या कुटुंबाला दिवाळखोरीमुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले.

त्यानंतर १९५१ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबई येथे स्थलांतरित झाले. शाळेच्या दिवसांमध्येच अगदी लहान वयात बेला डान्स ग्रुप मध्ये सहभागी झाल्या

bela bose, jay santoshi maa, bela bose passed away
Sayli Patil: परश्याची नवीन हिरोईन दिसायला अतिसुंदर सायली..

बेला बोसच्या वडिलांचा रस्ता अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.

आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती शोबिझचा एक भाग बनली. में नशे में हूं या डान्स नंबरने तिला ओळख मिळाली, ज्यामध्ये राज कपूर देखील होते. तिची पहिली प्रमुख भूमिका १९६२ मध्ये गुरूदत्त सोबत भाई या सिनेमात होती.

बेला यांनी अभिनेता आणि सिनेनिर्माता आशिष कुमार यांच्याशी लग्न केलं. आशिष कुमार सोबत त्यांनी गाजलेल्या जय संतोषी मां सिनेमात काम केले.

कवियित्री, चित्रकार आणि राज्यस्तरीय जलतरणपटू असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी युद्ध विधवा संघटनेच्या अध्यक्षा म्हणून काम केले होते.

bela bose, jay santoshi maa, bela bose passed away
वाह प्राजु वाह..! बेंगलोर मध्ये Prajakta Mali चा अस्सल मराठमोळा साज

बेला यांना आजवर तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलं फॅन फॉलोईंग मिळालं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती एक प्रेमळ आणि प्रेरणादायी आई आणि आजी होती. जय संतोषी माँ सिनेमात त्यांनी माँ दुर्गाची भूमिका साकारली.

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक भान जपणारी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून बेला यांना कायम ओळखले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com