'श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला नाही तर खूनच झाला असल्याचा दावा केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा ऋषिराज सिंह यांनी पुराव्यासकट केला आहे.

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला नाही तर खूनच झाला असल्याचा दावा केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल जीडीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा ऋषिराज सिंह यांनी पुराव्यासकट केला आहे.

ऋषिराज सिंह यांनी त्यांचा सहकारी डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यातून हा दावा केला आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन होते. गुन्हेगारी घटना आणि विशेषत: खूनी रहस्य सोडवण्यात ते तरबेज होते. ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांना श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. 

'मी उमादथनशी श्रीदेवी यांच्या हत्येबद्दल बोलत होतो. तेव्हा त्यांनी मला धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी श्रीदेवींच्या हत्येचा जवळून अभ्यास केला आहे. या तपासावेळी अशा काही घटना समोर आल्या ज्यातून स्पष्ट होतं की श्रीदेवी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यासंबंधी अनेक पुरावेदेखील असल्याचे ऋषिराज सिंह यांनी सांगितले आहे. 'कोणतीही व्यक्ती दारुच्या नशेत एका छोट्या बाथटबमध्ये बुडून मरू शकत नाही. असे यापूर्वीही ऋषिराज सिंह यांनी सांगितले आहे.

दरम्यान, 24 फेब्रुवारी 2018ला दुबईच्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. लग्नसमारंभात श्रीदेवींनी अतीमद्यपान केलं होतं. त्यानंतर त्या बाथरूमध्ये गेल्या तोल जाऊन पडल्या. पडल्यामुळं त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा मृत्यू अपघाती असल्याचं सांगण्यात आलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jail DGP makes shocking new claims about Sridevi’s demise