esakal | 'जेम्स बाँडचा सिनेमा पाहायचायं, तर मग 4 हजार कोटी द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

James Bond Makers Demand 600 Million

आतापर्यत निवडक ज्या काही चित्रपटांचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यात जेम्स बाँडच्या चित्रपटांचा क्रमांक वरचा आहे. आजही या चित्रपटाचा मोठा प्रेक्षकवर्ग पूर्ण जगभरात पसरला आहे.

'जेम्स बाँडचा सिनेमा पाहायचायं, तर मग 4 हजार कोटी द्या'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनाने अनेक निर्माते, दिग्दर्शक यांच्या डोकेदुखीत वाढ केली आहे. कित्येकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. अद्याप चित्रपटगृह पूर्ववत झाली नसल्याने थिएटर मालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ब-याचजणांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. हॉलीवूडचा प्रसिध्द जेम्स बाँड शेवटचा चित्रपट प्रदर्शित होण्यास अडथळे येत आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी ऑनलाईन स्ट्रिमिंग कंपनीने त्यांना एक ऑफर दिली.

आतापर्यत निवडक ज्या काही चित्रपटांचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यात जेम्स बाँडच्या चित्रपटांचा क्रमांक वरचा आहे. आजही या चित्रपटाचा मोठा प्रेक्षकवर्ग पूर्ण जगभरात पसरला आहे. जेम्स बॉण्ड या चित्रपट मालिकेतील ‘नो टाईम टू डाय’ हा   चित्रपट पुढील काही दिवसांत प्रदर्शित होणार होता. मात्र त्याला कोरोनाला फचका बसला आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्या आले आहे. हा चित्रपट थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा अशी मागणी काही ब्रॉडकास्टर्स करत आहेत. यात विशेष गोष्ट म्हणजे,  त्यावर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी थेट ६०० मिलिअन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ४ हजार ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईन, हॉटस्टार यांसारख्या काही बड्या ब्रॉडकास्टर्सने चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करावा असा सल्ला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिला होता. ते त्यांच्याकडून येणा-या उत्तराच्या प्रतिक्षेत होते. त्यांचा हा सल्ला निर्माते मायल जी विल्सन यांनी मान्य केला असून आपल्याला ४ हजार ४०० कोटी रुपये दिल्यास कुठल्याही अ‍ॅपवर चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशी खुली ऑफर त्यांनी ब्रॉडकास्टर्सला दिली आहे. मात्र त्यांची ही ऑफर अद्याप कुठल्याही ब्रॉडकास्टरने स्विकारलेली नाही.

‘जेम्स बॉण्ड: नो टाईम टू डाय’ हा चित्रपट अभिनेता डॅनिअल क्रेगचा शेवटचा बॉण्डपट आहे. त्यामुळे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. खरं तर निर्मात्यांच्या नियोजनाप्रमाणे हा चित्रपट मे महिन्यातच प्रदर्शित होणार होता. परंतु करोनामुळे चित्रपटाची तारीख डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र कोरोनाचं सावट अद्याप गेलेलं नाही. परिणामी आता २०२१ मध्येच सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.