
AVATAR 2:फक्त इथेच बघायला मिळेल ट्रेलर,दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
'मार्वल स्टुडिओ' त्यांच्या दमदार चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर सध्या त्यांच्या 'अवतार २' च्या रिलीज बाबत एक मोठा खुलासा पुढे येतोय.मार्वल स्टुडिओ त्याच्या बहुप्रतिष्ठीत चित्रपटाचं प्रदर्शन लवकरच करणार आहेत.त्यांचा हा चित्रपटाचा दुसरा भाग असून या चित्रपटाचा पहिला भाग २००९ मधे प्रदर्शित झाला होता.अगदी मोठ्या ब्रेक नंतर हा चित्रपट आता प्रेक्षकांपुढे येणार आहे.त्यासाठी प्रेक्षक अत्यंत उत्सुक असून प्रेक्षकांसाठी आता दिग्दर्शकाने एक गुड न्यूज दिली आहे. (Avatar 2 Movie Updates)

वाचा नेमका कधी रिलीज होणार अवतार २ चा ट्रेलर
'अवतार २' चा पहिला ट्रेलर 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' सोबत पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.जेम्स कॅमरॉनने त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन प्रिमीयमच्या सात महिन्याआधीच सुरू केलय.अवतार चित्रपटाचा पहिला ट्रेलर 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' सोबत रिलीज केल्या जाईल.तसेच चित्रपटाच्या नावाचा खुलासा आधीच झाला असल्याने सध्या नेटिजन्स मधे याची जोरदार चर्चा सुरु आहे.'अवतार द वे ऑफ वॉटर' असे या चित्रपटाला नाव देण्यात आले आहे.तसेच तुमच्या माहितीसाठी 'अवतार २' ऑनलाईन रिलीज होणार आहे.पहिल्या भागाच्या यशस्वीतेनंतर तब्बल १३ वर्षांनी येत्या ६ मे ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.त्यामुळे डिज्नीवर या चित्रपटाचा ट्रेलर बघण्यास प्रेक्षक आतुर होऊन वाट बघत आहेत.

'जेम्स कॅमरॉन' तब्बल १३ वर्षानंतर त्याचा हा चित्रपट प्रदर्शित करतोय.अवतार भाग १ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरल्यानंतर आता जेम्स कॅमरून त्याच्या 'अवतार भाग २' मधे काय खास घेऊन येणार याचीच प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.पेंडोराच्या जेक सुली आणि नेतिरीची एक कहाणी घेऊन प्रेक्षकांपुढे लवकरच येणार हा चित्रपट.
Web Title: James Cameron Releasing Trailer Avatar 2 On An Online
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..