Janhvi Kapoor च्या वाढदिवसाला तिच्या नव्या सिनेमाची घोषणा, RRR फेम अभिनेत्यासोबत करणार रोमान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

janhvi kapoor, NTR 30, jr. ntr, janhvi kapoor new south movie

Janhvi Kapoor च्या वाढदिवसाला तिच्या नव्या सिनेमाची घोषणा, RRR फेम अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

Janhavi Kapoor South Movie: अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज वाढदिवस आहे. जान्हवीला सोशल मीडियावर तिचे फॅन्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. जान्हवीच्या वाढदिवसालाच तिने तिच्या फॅन्सना मोठं सरप्राईज दिलंय.

जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. आता बॉलिवूड गाजवून जान्हवी थेट साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करतेय.

( Janhavi Kapoor's new movie Announcing on her birthday, she is making her south debut with jr, ntr)

जान्हवी आता थेट Jr NTR सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. Jr NTR च्या बहुप्रतिक्षित NTR 30 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

या सिनेमात अभिनेत्री म्हणून कोण झळकणार याची सगळजण आतुरतेने वाट बघत होते. पण अखेर याचा उलगडा झाला असून अभिनेत्री जान्हवी कपूर Jr NTR ची हिरोईन म्हणून या सिनेमात झळकणार आहे.

कोरतला शिवा दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा NTR 30 सिनेमा मधून जान्हवी कपूर साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.

सिनेमाच्या निर्मात्यांनी आज जाहीर केले आहे की धडक फेम अभिनेत्री NTR 30 मध्ये जूनियर एनटीआरसोबत रोमान्स करण्यासाठी सज्ज आहे. आज जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त जान्हवी कपूरचे सिनेमातले एक सुंदर पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार Jr NTR आणि जान्हवी कपूर सोबतच अनेक प्रसिद्ध कलाकार या सिनेमाचा भाग असणार आहेत. 18 मार्च 2023 पासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. यानिमिताने जान्हवीला तिच्या वाढदिवसाचं मिळालेलं हे खास गिफ्ट आहे.

त्यामुळे आता बॉलिवूड गाजवून जान्हवी साऊथ मध्ये RRR फेम Jr NTR सोबत रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे.

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. तिनं नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ तसंच रील शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

जान्हवी कपूर नेहमीच आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत चांगल्या आणि निवडक भूमिका करताना दिसली. केवळ बॉलीवुडमध्येच नाही तर साऊथमध्येही तिचे खूप चाहते आहेत. वडील बोनी कपूर आणि आई अभिनेत्री श्रीदेवी यांच्याकडूनच तिला अभिनयाचा वारसा लाभला आहे.

टॅग्स :Marathi News Bollywood