esakal | 'बिग बॉस'च्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी, 'या' कारणामुळे शो उशीरा सुरु होणार
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss 14

'बिग बॉस' हा शो सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र 'बिग बॉस'च्या चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे. 'बिग बॉस १४' एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय.

'बिग बॉस'च्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी, 'या' कारणामुळे शो उशीरा सुरु होणार

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सलमान खानचे चाहते 'बिग बॉस २०२०' च्या सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा शो सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र 'बिग बॉस'च्या चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे. 'बिग बॉस १४' एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय.

हे ही वाचा: 'सडक २' रिलीजच्या दोन दिवस आधी संजय दत्त करणार 'या' सिनेमाच्या शूटींगला सुरुवात

एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चॅनल आणि निर्मात्यांना 'बिग बॉस' आणखी एक महिना पुढे ढकलावं लागत आहे. याचं कारण म्हणजे मुंबईचा पाऊस. मुंबईमध्ये दररोज होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सेटवर रिपेअरिंगच्या कामाचं नुकसान झालं आहे. पावसामुळे आता हे रिपेअरिंगचं काम देखील उशीरा होईल. 'बिग बॉस'चा सेटही अजुन स्पर्धकांसाठी पूर्णपणे तयार नाहीये. सेटवर अनेक प्रकारे खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे आता 'बिग बॉस १४' ऑक्टोबरमध्ये टेलिकास्ट होणार असल्याचं कळतंय.

तर दुस-या सुत्रांकडून अशी माहिती कळतेय की यावेळी निर्माते हा शो ४ ऑक्टोबरपासून लाईव्ह करण्याचा प्लान करत आहेत. मात्र अजुनही या शोच्या टेलिकास्ट होण्यावरुन गोंधळ आहे. 'बिग बॉस'चा १४ वा सिझन १४ सप्टेंबरला लॉन्च होणार असल्याने चाहते खूपंच उत्सुक होते. यावेळी हा सिझन खूप वेगळा असणार आहे कारण कोरोनाच्या काळात तो टेलिकास्ट केला जाणार आहे. शोचे प्रोमो आधीच रिलीज झाले आहेत.

'बिग बॉस १४' ला यावेळी 'बिग बॉस २०२०' असं देखील म्हटलं जातंय. तसंच यावेळी या शोची टॅगलाईन आहे 'इस बार सीन पलटेगा.' त्यामुळे टॅगलाईन प्रमाणेच यंदाचा 'बिग बॉस' प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणारे हेच पाहायचंय.   

what salman khan show bigg boss 2020 postponed for october know reason  

loading image
go to top