Janhvi Kapoor : 'आता तू ही उर्फीला कॉपी...', जान्हवीचा बोल्ड अवतार पाहून नेटकरी चांगलेच भडकले

Janhvi Kapoor Trolled : जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.
Janhvi Kapoor
Janhvi KapoorSakal
Updated on

Bollywood News : बोनी कपूर यांची लाडकी जान्हवी कपूर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. चाहत्यांना तिच्या बोल्ड आणि हॉट लूकचे वेड लागले आहे. आता नुकताच तिचा आणखी एक बोल्ड लूक समोर आला आहे. जिथे जान्हवी अवॉर्ड नाईटमध्ये पोहोचली होती. यावेळी जान्हवी थाई-हाय स्लिट बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली. जे पाहून सोशल मीडियावर युजर्सचा पारा चढला आहे.

जान्हवी कपूर नुकतीच एका अवॉर्ड नाईटमध्ये सहभागी झाली होती. ज्यामध्ये ती थाई-हाई स्लिट बॅकलेस ड्रेस परिधान करून पोहोचली होती. ड्रेसमध्ये कमरेच्या दोन्ही बाजूंना कट होता. तसेच समोर एक कट होता. याशिवाय बॅकलेस ड्रेसच्या मागील बाजूस अनेक स्ट्रिप्स होत्या. या बोल्ड लूकमध्ये जान्हवी खूपच हॉट दिसत होती.

Janhvi Kapoor
Barkha Bisht: 13 वर्षांच्या संसारानंतर बरखा आणि इंद्रनील होणार विभक्त, म्हणाली- 'हा जीवनातील...'

जान्हवीच्या या लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स तिला खूप ट्रोल करत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, 'उर्फीपासून आयडिया घेतली वाटतं'. तर दुसर्‍याने लिहिले, 'गुपचूप आता सर्वजण उर्फीला कॉपी करत आहेत.' एका यूजरने लिहिले की, 'मला वाटले ती उर्फी आहे.' त्याचवेळी, 'प्रत्येकाला उर्फीसारखे बनायचे आहे', अशी कमेंट एका ट्रोलरने केली आहे.

जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच वरुण धवनच्या विरुद्ध बवाल या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही राजकुमार रावसोबत ती दिसणार आहे. यासोबतच जान्हवी RRR स्टार ज्युनियर NTR सोबत तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com