Janhvi Kapoor: 'नेपोटिज्म की बच्ची...', जान्हवी कपूरला स्टार किड असल्याचा होतो पश्चाताप ?

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरने तिच्या करिअरबद्दल सांगितले आहे.
janhvi kapoor
janhvi kapoorSakal

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 'मिली', 'गुडलक जेरी', 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' यांसारख्या चित्रपटांतून तिने आपला अभिनय कौशल्य सिद्ध केला आहे. ती तिच्या चित्रपटांसाठी कठोर परिश्रम करण्यास मागे हटत नाही.

पण, यानंतरही ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलच्या निशाण्यावर असते. जान्हवी म्हणते, 'लोकांना वाटते की स्टार किड असल्याने मला लगेचच संधी मिळतात, पण त्यामुळे माझे खूप नुकसान झाले आहे'.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरने तिच्या करिअरबद्दल सांगितले, "ती म्हणाली की जेव्हा ती तिच्या पात्रासाठी कठोर परिश्रम घेते, मानसिक अस्वस्थतेतून जात असते आणि मग इंटरनेटवर कोणीतरी तिच्या अभिनय कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात किंवा 'नेपोटिज्म की बच्ची...' अशी कमेंट करतात, तेव्हा खूप त्रास होतो.

जान्हवी कपूर म्हणाली, 'लोकांचा असा अंदाज आहे की मला सर्वकाही सहज मिळाले आहे. पण, मेहनत करणे हे माझे प्राधान्य आहे. मी माझ्या आयुष्यातील ध्येयांबद्दल खूप स्पष्ट आहे. मला माझ्या आईचा वारसा चालवायचा आहे. हा माझा घमंड नसून ही माझी इच्छा आहे".

janhvi kapoor
Bhau Kadam घरी आला अन् घरच्या कुत्र्यानं थेट..., व्हायरल व्हिडीओवर भन्नाट कमेंट्सचा वर्षाव

विशेष म्हणजे जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आहे. जान्हवीने 2018 साली 'धडक' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जान्हवीची धाकटी बहीण खुशी कपूरही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

खुशी झोया अख्तरच्या 'आर्चीज' चित्रपटात दिसणार आहे, जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात खुशी व्यतिरिक्त इतर अनेक स्टारकिड्स दिसणार आहेत. जान्हवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच दोस्ताना 2, बवाल या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com