कोण आहे जान्हवीचा मिस्ट्री बॉय? पार्टीतील व्हायरल व्हिडीओनं चर्चेला उधाण... Janhvi Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janhvi kapoor walks hand in hand with orhan awtarmani video goes viral

Janhvi Kapoor: कोण आहे जान्हवीचा मिस्ट्री बॉय? पार्टीतील व्हायरल व्हिडीओनं चर्चेला उधाण...

Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जान्हवी तिच्या फॅशन सेन्समुळेच नाही तर तिच्या व्हॅकेशन्समुळे देखील लॅमलाईटमध्ये असते. पण आता चर्चा होत आहे ती वेगळीच, आतापर्यंत जान्हवीचे नाव अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत जोडले गेले आहे. पण जान्हवी तिच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलली नाही. सध्या जान्हवीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या मिस्ट्री बॉयचा हात धरुन पार्टीत एन्ट्री करताना दिसत आहे. जसा हा व्हिडीओ समोर आला तसं जान्हवीच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगलेली पहायला मिळाली.(Janhvi kapoor walks hand in hand with orhan awtarmani video goes viral)

हेही वाचा: Priyanka Chopra: ब्रेकअपनंतरही प्रियंका बॉयफ्रेंड सोबत झालेली इंटिमेट,बायकोचा व्हिडीओ पाहून निकची उडणार झोप

जान्हवी कपूरने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पण या अवॉर्ड नाईटमध्ये जान्हवी एकटी नाही तर तिचा खास मित्र ओरहान अवत्रामणीसोबत पोहोचली होती. जान्हवीने ओरहानसोबत पापाराझींनाही अनेक पोझ दिल्या. एवढेच नाही तर जान्हवी ओरहानचा हात धरत सोहळ्यात एन्ट्री करताना दिसली. जान्हवीची ओरहानसोबत खास बाँडिंग पाहून हे दोघे एकमेकांच्या डेट करत आहे की काय? असा सवाल आता सर्व करू लागलेयत.

हेही वाचा: Taaza Khabar: सचिन पिळगावकरांच्या लेकीनं आलियालाही टाकलं मागे, वेश्येच्या भूमिकेत भाव खाऊन गेली श्रिया..

जान्हवीच्या लूकची देखील बरीच चर्चा होत आहे. कटआउट फिशकट ड्रेसमध्ये जान्हवीनं परफेक्ट लूक कॅरी केला होता. तिने तिच्या ग्लॅमरस अवताराने संपूर्ण लाईमलाईट स्वतःकडे खेचून घेतली होती. मात्र, अनेक लोक जान्हवीच्या ड्रेसची उर्फी जावेदच्या कपड्यांशी तुलना करत आहेत. पण काही चाहत्यांना जान्हवीचा हा ग्लॅमरस अवतार खूपच आवडला आहे.

हेही वाचा- संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

कोण आहे ओरहान अवत्रामणी?

जान्हवी कपूर आणि ओरहान अवत्रामणी यांच्यात जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. ओरहान एक सामाजिक कार्यकर्ता आहे. याशिवाय तो अनेकदा बॉलिवूड स्टारकिड्ससोबत सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करताना दिसतो. त्याची फॅन फॉलोइंग देखील खूप मजबूत आहे.आता जान्हवी ओरहान सोबत नाव जोडले गेल्यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.