गिरगावातील राजेश खन्ना स्पेशल दहीहंडी माहीत आहे का?काय सांगतो इतिहास?वाचा.. Rajesh Khanna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janmashtami 2022- Rajesh Khanna special Dahihandi at Girgaon,Mumbai, celebration

गिरगावातील राजेश खन्ना स्पेशल दहीहंडी माहीत आहे का?काय सांगतो इतिहास?वाचा..

Janmashtami 2022: मुंबईतलं(Mumbai) गिरगाव म्हणजे परंपरांचं माहेरघर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथले सर्वच जाती-धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. बरं,आजही इथे सण दारं बंद करुन घरात बसून साजरे केले जात नाहीत,तर रस्त्यावर उतरुन एकमेकांच्या आनंदात मिसळून जल्लोषात इथं सणांना खऱ्या अर्थानं सेलिब्रेट केलं जातं. इथली प्रत्येक गल्ली, वाडी,चाळ सणांच्या दिवशी उजळून निघते. दहीहंडीची तर गिरगावला विशेष परंपरा लाभली आहे. सर्वसामान्यच नाहीत तर सेलिब्रिटींचे देखील गिरगावशी खास कनेक्शन. बॉलीवूडचे(Bollywood) पहिले सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचं देखील गिरगावशी असंच घनिष्ठ नातं आहे. इथे आजही राजेश खन्ना स्पेशल दहीहंडी बांधली जाते,जी इथली मानाची दहीहंडी(Janmashtami) आहे. ही हंडी फोडणं सर्वच गोपाळांसाठी मानाची गोष्ट आहे. चला जाणून घेऊया, गिरगावात नेमकी कुठे बांधली जाते ही दहीहंडी, काय आहे तिचा इतिहास?(Janmashtami 2022- Rajesh Khanna special Dahihandi at Girgaon,Mumbai, celebration)

हेही वाचा: दोन वर्षांची तंगी मिटली,दहीहंडीला मराठी कलाकारांच्या 'सुपारी'ची रंगली चर्चा

राजेश खन्ना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की बान्द्रा इथे राहायचे. आजही त्यांचा आशीर्वाद बंगला तिथं दिमाखात उभा आहे. अर्थात राजेश खन्ना असेपर्यंत त्या बंगल्याचे त्यांच्या चाहत्यांना विशेष आकर्षण होते. पण तुम्हाला माहीत आहे का, राजेश खन्ना यांचे शालेय शिक्षण कुठे झालंय,ते कॉलेजात कुठे जायचे किंवा कुठे राहायचे? तर राजेश खन्ना हे मुळचे गिरगावचे, गिरगावातील सरस्वती निवास,ठाकुरद्वार जवळच्या इमारतीत त्यांचे घर होते. ठाकुरद्वार च्या शाळेत काही वर्ष ते शिकले. के.सी कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. तर पहिल्यापासूनच सधन असलेल्या राजेश खन्ना यांच्या कुटुंबाकडून या ठाकुरद्वार इथल्या सरस्वती निवास येथे बांधल्या जाणाऱ्या दहीहंडीसाठी मोठी वर्गणी दिली जायची.

हेही वाचा: 'मिस यू पट्या!' दिवंगत प्रदीप पटवर्धन आणि गिरगावची दहीहंडी,आहे खास कनेक्शन

पुढे राजेश खन्ना अभिनेते झाले. पण त्यांनीही त्या दहीहंडीला मोठी वर्गणी देणं सुरु ठेवलं. राजेश खन्ना यांचा 'आराधना' सुपरहिट झाल्यावर नंतर ते ब्रान्द्रा येथील आशीर्वाद बंगल्यात राहायला गेले. मग काही वर्ष त्यांनी वर्गणी देणं सुरु ठेवलं पण पुढे कामाच्या व्यापात राहून गेलं. त्यानंतर राजेश खन्ना यांच्या निधनानंतर या गिरगावातील सरस्वती निवासच्या लोकांनी राजेश खन्ना यांच्या आठवणीत या दहीहंडीचे राजेश खन्ना स्पेशल दहीहंडी असं नामकरण केलं आणि त्यानंतर ती मानाची दहीहंडी म्हणून आता ओळखली जाते. आज अनेक दहीहंडी पथकं राजेश खन्ना यांच्या या स्पेशल दहीहंडी चा मान पटकावण्यासाठी शिस्तीत उंच मनोरे लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आणि हा विभाग राजेश खन्ना यांच्या सिनेमातील गाण्यांनी दहीहंडीच्या दिवशी रंगलेला देखील दिसून येतो.

Web Title: Janmashtami 2022 Rajesh Khanna Special Dahihandi At Girgaonmumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..