esakal | आमिर खान, आदित्य चोप्रा न्यायालयाच्या कचाट्यात

बोलून बातमी शोधा

aditya chopra and aamir khan}

वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

आमिर खान, आदित्य चोप्रा न्यायालयाच्या कचाट्यात
sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

बॉलिवूड अभिनेता अमिर खान आणि अमिताभ बच्चनचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्राने केली होती. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. आता जातीयवादाच्या आरोपाखाली न्यायालयाने अभिनेता आमिर खान तसेच निर्माता आदित्य चोप्रा यांच्यासह चौघांना नोटीस जारी केली आहे. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटात मल्लाह जातीचा उल्लेख 'फिरंगी' आणि 'ठग्स' असा करून या जातीचा अपमान केला आहे अशी तक्रार हंसराज चौधरी यांनी  2018 साली केली होती. याचिका दाखल करणारे हंसराज यांचे मत आहे की, 'केवळ नफा कमावण्यासाठी निर्मात्यांनी सिनेमाचं नाव असं ठेवलं आहे. प्रत्यक्षात या सिनेमातून अनेक प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवाय या सिनेमातून मल्लाह समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आहे.'

जिल्हा न्यायालयाने याचिकेवर पुर्नविचार करत आमिर खान, आदित्य चोप्रासह चौघांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार आहे. प्रत्येक चित्रपटाच्या सुरूवातीला वैधानिक इशारा दिला जातो ज्यामध्ये असे लिहीलेले असते की, 'सिनेमाच्या घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. कुणाच्या भावना दुखावण्यासाठी नव्हे तर मनोरंजानासाठी सिनेमाची निर्मिती केली जाते'. हे या ही चित्रपटाच्या सुरूवातीला लिहीले होते त्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाने ही  हंसराज चौधरी यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर हंसराज यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.

हेही वाचा : अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मध्ये आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट होती. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केली नव्हती. बॉक्स ऑफिसवर पुरेशा नफाअभावी चित्रपट निर्मात्यांचेही फार नुकसान झाले होते.