esakal | 'तालिबानी जंगली, आरएसएस आणि बजरंग दलही त्यांच्यासारखेच'...
sakal

बोलून बातमी शोधा

javed akhtar

'तालिबानी जंगली, आरएसएस आणि बजरंग दलही त्यांच्यासारखेच'...

sakal_logo
By
सुधीर काकडे

तालिबानने (Taliban) सध्या अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पुढच्या काही दिवसांत तालिबान अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता स्थापन करणार आहे. तालिबानची आज पर्यंतची प्रतिमा आणि इतिहासात तालिबान्यांनी लागू केलेल्या कायद्यांवरुन जगभरातून तालिबानच्या हालचालींवर वेगवेळ्या प्रतिक्रीया उमटतना दिसता आहेत. भारतातील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी देखील तालिबान विषयी आपले मत व्यक्त केले आहे. जावेद अख्तर यांनी यावेळी तालिबानवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंगदल या संघटनांवर देखील टीका केली आहे. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय आहे. हे बोलताना पुढे ते असेही म्हणाले की, आरएसएस(RSS), विश्व हिंदू परिषद(VHP) आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान साऱखेच आहेत. राज्यसभेचे माजी खासदार असलेल्या जावेद अख्तर यांनी देशातील एक मुस्लिम समुह देखील तालिबानचे समर्थन करतोय अस विधान एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

जावेद अख्तर यांनी या विषयावर बोलताना अतीशय परखड मत व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. तालिबान आणि तालिबान सारखे बनण्याची ईच्छा ठेवणारे सारखेच आहेत. देशातील काही मुस्लिम समाजातील एक गट तालिबानचे स्वागत करतोय, असे म्हणत त्यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्या लोकांवर टीका केली. तसेच पुढे या मुलाखतीत ते म्हणाले की, जगभरातील उजव्या विचारसरणीचे लोक सारखेच आहेत. भारतात जमावाकडून होणाऱ्य़ा मारहाणीच्या घटनांबद्दल बोलताना अख्तर म्हणाले की, या घटना म्हणजे तालिबान बनण्याची फुल ड्रेस रिहर्सल आहे. हे लोक तालिबानच्या कृत्यांना स्विकारता आहे. हे सर्व एकच आहेत, फक्त नावाचा फरक आहे.

हेही वाचा: ड्रग्जच्या गेला आहारी, नको त्या अवस्थेत सापडला सिद्धार्थ सागर

पुढे बोलताना ते म्हणाले की, आरएसअस, विश्व हिंदु परिषद, बजरंग दलासारख्या संघटनांचे जे लोक समर्थन करतात, त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नक्कीच तालिबान हे मध्ययुगीन मानसिकतेचे समर्थन करणारं संघटन आहे, मात्र आपण ज्या लोकांना समर्थन करताय ते त्यापेक्षा वेगळे आहेत का? या लोकांची मानसिता तालिबान सारखीच आहेत.

loading image
go to top