Javed Akhtar on Nepotism: फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम होऊच शकत नाही! जावेद अख्तर नेमकंं काय म्हणाले?

Javed Akhtar On Nepotism: एका कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर यांनी नेपोटिझम यावर भाष्य केलं आहे.
Javed Akhtar on Nepotism
Javed Akhtar on NepotismEsakal

Javed Akhtar on Nepotism: बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांसाठी ओळखले जातात. त्यात एक चर्चेतील नाव म्हणजे सुप्रसिद्ध बॉलीवूड गीतकार आणि लेखक जावेद अख्तर.

Javed Akhtar on Nepotism
Sa Re Ga Ma Pa 2023 Winner: पश्चिम बंगालचा अल्बर्ट ठरला 'सा रे ग म प 2023' चा विजेता!

जावेद अख्तर हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांचे बरिच वक्तव्य ही त्याच्यांसाठी अनेकदा अडचणीचा विषय बनली आहे. मात्र काहीही झालं तरी जावेद अख्तर नेहमी आपलं मत बिनधास्तपणे मांडत असतात.

आता पुन्हा त्यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. बॉलिवूडमध्ये अनेकदा नेपोटिझमला प्रोत्साहन दिले जाते असा आरोप अनेक कलाकारांवर करण्यात येतो. नुकतेच जावेदने नेपोटिझम या विषयावर आपले मत स्पष्ट केलं. साहित्य आज तकच्या कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर यांनी यावर भाष्य केलं आहे.

यावेळी जावेद म्हणाले , " इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम नाही आहे. नेपोटिझम हा केवळ लोकांच्या मनातला एक गैरसमज आहे. निर्माता चित्रपट बनवतो आणि त्यात पैसे गुंतवतो. आता तो त्याच्या चित्रपटात कोणाला घेतो किंवा कोणाला नाही घेत हा त्याचा निर्णय असतो. कोणाला स्टार बनवायचे आणि कोणाला नाही हे सर्व काही प्रेक्षकांवर अवलंबून असते. इंडस्ट्रीमध्ये नेहमी घराणेशाही बाबत चर्चा होते, परंतु मी सांगतो की असे होऊच शकत नाही."

आपलं मत मांडताना जावेद पुढे म्हणाले की, "ही अशी निवड आहे जिथे हेराफेरी होऊच शकत नाही. कारण इथे कलाकारांना स्टार बनवणे प्रेक्षकांच्या हातात असते. निर्माता स्वत:च्या जबाबदारीवर चित्रपट बनवत आहे. त्याचे पैसे खर्च करतात.अशा परिस्थितीत त्याचा चित्रपट फ्लॉप झाला तर त्याचेच पैसे बुडतील."

Javed Akhtar on Nepotism
Filmfare OTT Awards 2023: कोण आहेत फिल्मफेयर OTT अ‍ॅवॉर्ड्सचे मानकरी? वाचा विजेत्यांची यादी

तर यावेळी बोलताना त्यांनी आपली मुलगी झोयाच्या 'द आर्चीज' चित्रपटाबाबतही भाष्य केले. तिच्या 'द आर्चीज' चित्रपटात स्टार किड्सची जत्रा भरल्याचे बोलले जाते मात्र या चित्रपटात इतके स्टार किड्सची का घेतले? याबद्दल बोलताना त्यांनी आपल्या लेकीचा बचाव केला.

जावेद अख्तर यांची मुलगी झोया ही सध्या 'द आर्चीज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'द आर्चीज'मध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचा समावेश आहे. तर या चित्रपटातील गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com