फरहानच्या दुसऱ्या लग्नावर वडिल जावेद अख्तर म्हणाले...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

फरहान अख्तर एका मराठमोळ्या मॉडेलशी लग्न करणार असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु आहे. मॉडेल शिबानी दांडेकर आणि फरहान लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे आणि त्यावर फरहानचे वडिल जावेद अख्तर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेकजण लग्नबंधनात अडकत आहेत. बॉलिवूडमध्ये डेटिंग आणि ब्रेकअप हे नवीन नाही. घटस्फोटानंतरही अनेक कलाकारांना त्यांचे प्रेम मिळण्यात यश आलं आहे. अनुष्का-विराट, प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर नंतर आता आणखी एक क्युट कपल लग्न करणार आहेत. बॉलिवूडचा अभिनेता फरहान अख्तर एका मराठमोळ्या मॉडेलशी लग्न करणार असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु आहे. मॉडेल शिबानी दांडेकर आणि फरहान लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे आणि त्यावर फरहानचे वडिल जावेद अख्तर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Daddy love #happyholi #celebration #festivalfun #jankikutir Image: @sandymridul 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

फरहान अख्तर गेल्या दोन वर्षांपासून मॉडेल शिबानी दांडेकरला डेट करत आहे. रिलेशनशिपमध्ये आल्यावर सुरुवातीला या दोघांनी नात सर्वांपासून लपवून ठेवलं. नंतर मात्र आपल्या नात्याचा खुलासा त्यांनी केला. एकमेकांसोबत ते अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. शिवाय सोशल मीडियावरही दोघं एकमेकांसोबतचे क्युट फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी शिबानी फरहानच्या परिवारासोबतही दिसली.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sunshine and smiles. @shibanidandekar 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

लाईव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार शिबानी आणि फरहानच्या लग्नावर जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, '' या दोघांच्या लग्नाविषयी तर मला आता तुमच्याकडून कळत आहे. फरहानच्या वाढदिवशी मी त्याच्यासोबतच होतो. पण, तो मला काही बोलला नाही. तुम्हाला माहित आहे ना मुलं खूप काही लपवून ठेवतात. शिबानीला मी अनेकदा भेटलो आहे. ती गोड मुलगी आहे.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Dada time  @akiraakhtar @chatdelalune

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

फरहान अख्तरचा घटस्फोट झाला असून त्याला दोन गोंडस मुली आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना होते. अधुना आणि फरहान यांनी 2002 मध्ये लग्न केलं होतं आणि 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला. शिबानीच्या आधीही फरहान रिलेशनशिपमध्ये होता. तो अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करत असल्याची चर्चा होती. पण त्या दोघांनी अधिकृतपणे रिलेशनशिपची माहिती दिली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Diwali mubarak sabko.Khushi shanti mohabbat sabko miley

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18) on

शिबानी एक गायक, अभिनेत्री, अॅंकर आणि मॉडेल आहे. अमेरिकेतील एका मोठ्या टेलिव्हिजन शोच्या सुत्रसंचलनाने तिने करीअरला सुरुवात केली. भारतातही तिने अनेक गाणी आणि शोचं सुत्रसंचलन केलं आहे. शिवाय ती अनेक मोठ्या ब्रॅंडसाठी मॉडेलिंग करते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 @faroutakhtar #javedakhtar @abheetgidwani @ankurtewari @thesubaya  @sandymridul 

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Javed akhtars reaction on shibani and farhan marriage