Google Celebrates Jawan: गुगलवर फक्त 'जवान' टाईप करा अन् बघा....! जगभर किंग खानचा डंका

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक मोठ्या आतुरतेनं शाहरुखच्या जवानची वाट पाहत होते.
Google Celebrates Jawan: गुगलवर फक्त 'जवान' टाईप करा अन् बघा....!  जगभर किंग खानचा डंका
Google Celebrates Jawan: गुगलवर फक्त 'जवान' टाईप करा अन् बघा....! जगभर किंग खानचा डंकाesakal
Updated on

Search Jawan On Google : किंग खानच्या जवाननं साऱ्या देशाला वेडं केलं आहे. त्या चित्रपटाची क्रेझ एवढी मोठी आहे की, आता गुगल सर्च इंजिनला देखील त्याची दखल घ्यावी लागली आहे. तुम्ही फक्त आता गुगलवर जवान शब्द टाईप करायची खोटी अन् तुम्हाला लगेच गुगल जो परिणाम दाखवते तो मात्र भन्नाट आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक मोठ्या आतुरतेनं शाहरुखच्या जवानची वाट पाहत होते. आता तो चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यानं जगभरातून १२९ कोटींची कमाई केली आहे तर एकट्या भारतातून ७५ कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. यावरुन शाहरुख खानचा चाहतावर्ग आणि त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद किती प्रचंड आहे हे दिसून येईल.

गुगलनं देखील शाहरुखच्या जवानचे सेलिब्रेशन केले आहे. त्यांनी जवान टाईप करताच बँडेच्या स्ट्रीप्स गुगल पेजवर सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर शाहरुखच्या आवाजात रेडी असा आवाज येत नेटकऱ्यांना आगळी वेगळी ट्रीट दिली आहे.

Google Celebrates Jawan: गुगलवर फक्त 'जवान' टाईप करा अन् बघा....!  जगभर किंग खानचा डंका
Kangana Ranaut On Jawan: कंगनाही झाली 'जवान'च्या प्रेमात वेडी! लाबंलचक पोस्ट शेयर करत गायलं शाहरुखचं गुणगाण!

अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये मुख्यत्वे करुन साऊथच्या कलाकारांची संख्या अधिक आहे. त्यात विजय सेतुपति, नयनतारा, प्रियामणि, तर संगीतकार म्हणून अनिरुद्धनं जबाबदारी पार पाडली आहे. शाहरुखच्या या प्रोजेक्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. यापूर्वी त्याच्या पठाण या चित्रपटावरुन वाद झाला होता. आता मात्र जवाननं विक्रमी कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.

जवान पाहून अनेकांनी शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यात ऑस्कर विजेते दिग्दर्शक राजामौली, प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख, कंगना रनौत, माधुरी दीक्षित यांनी देखील शाहरुखची मुक्त कंठानं प्रशंसा केली आहे. रितेशनं एक्सवर जी पोस्ट केली आहे त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत त्याचे आभार मानले आहे.

पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारी हिंदी चित्रपट म्हणून जवानची नोंद घेतली गेली आहे. जवाननं सध्या वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर करण्यास सुरुवात केली आहे. जवाननं पठाणचे फर्स्ट डे फर्स्ट शो चे जे कलेक्शन होते ते रेकॉर्ड देखील ब्रेक केले आहे. जगभरातून जवाननं शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Google Celebrates Jawan: गुगलवर फक्त 'जवान' टाईप करा अन् बघा....!  जगभर किंग खानचा डंका
Kangana Ranaut On Jawan: कंगनाही झाली 'जवान'च्या प्रेमात वेडी! लाबंलचक पोस्ट शेयर करत गायलं शाहरुखचं गुणगाण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com