Jawan Reaction: हा तर चमत्कार! नेहमी ट्रोल करणाऱ्या निर्मात्याने देखील केलं शाहरुखच्या जवानचं भरभरुन कौतुक!

Jawan Reaction:
Jawan Reaction:Esakal

Jawan Reaction: बॉलिवूडचा किंग खान म्हणून जगभरात ओळखला जाणारा शाहरुख खान हा त्याच्या 'जवान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज सर्वत्र जवान चित्रपट रिलिज झाला आहे. रिलिज होताच चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' अनेक ठिकाणी मध्यरात्री 2.15 वाजता तर काही ठिकाणी पहाटे 5 वाजता सुरू करण्यात आला. तर मुंबईतील गेटी गॅलेक्सीमध्ये सकाळी 6 वाजता 'जवान'चा फर्स्ट डे फर्स्ट शो सुरू झाला.

त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपुर्वी शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा रिलिज झाला आणि या चित्रपटासोबतच शाहरुखने चार वर्षानंतर कमबॅक केला.

पठाणने अनेक रेकॉर्ड मोडले. त्यामुळे त्याचे चाहते आता जवान चित्रपटासाठी खुप उत्सूक होतेच. आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'जवान'ला खूप चांगले प्रतिसाद मिळत आहेत.

Jawan Reaction:
Janmashtami 2023: विकी कौशलने लहान मुलांसोबत साजरी केली दहीहंडी, आठवणीत रमला, फोटो व्हायरल

सोशल मीडियावरल फक्त शाहरुखच्या जवानचीच चर्चा आहे. याचित्रपटाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरल व्हायरल होत आहेत. विषेश म्हणजे या चित्रपटाबाबत सर्वांनी सकारात्मकच प्रतिक्रिया दिली आहे.

प्रेक्षक चित्रपट पाहतांना नाचताय गाताय आणि थिएटरमध्ये जल्लोष करतांना दिसत आहे. आता त्यातच स्वत: ला चित्रपट समीक्षक सांगणारा कमाल आर खान म्हणजेच केआरके याने देखील या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे.

Jawan Reaction:
Janmashtami 2023: ड्रिम गर्ल ते बिग बी...'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

केआरके नेहमीच त्याच्या ट्विटमधून अनेकांनाच्या चित्रपटावर टीका करत असतात. अशातच शाहरुखच्या चित्रपटाबाबत तर तो नेहमीच नकारात्मक प्रतिक्रिया देत असतो. मात्र आज केआरकेचं ट्विट हे खुपच चर्चेत आलं आहे. कमलने त्याच्या ट्विटर हँडलवर दोन ट्विट केले आहेत, पहिल्या ट्विटमध्ये तो 'जवान' पाहण्यासाठी गेलो असल्याचं सांगितलं. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने चित्रपटाचा रिव्ह्यू शेयर केला आहे.

यात केआरकेने लिहिले की, 'जवान हा एक उत्तम चित्रपट आहे. उत्तम अॅक्शन, अभिनय, उत्तम कथा आणि उत्तम संगीत. हा संपूर्ण मनोरंजन करणारा सिनेमा आहे. अ‍ॅटली दुसऱ्या इंटरव्हलमध्ये ही जादू कायम ठेवेल, अशी आशा आहे.

तर चित्रपट पाहिल्यानंतर त्याने लिहिले की, जवान हा चित्रपट व्यवस्थेवर आणि भ्रष्टाचारावर थेट हल्ला करणारा आहे.

Jawan Reaction:
Jawan Girija Oak: "मला त्या गोष्टीची चीड येते"; जवानमध्ये शाहरुख सोबत काम केलेल्या गिरीजा ओकचा खुलासा

शाहरुखने दोन्ही भूमिका साकारतांना दमदार अभिनय केला आहे. शाहरुख आणि नयनताराने आपापल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या. संजय दत्त याने खूप चांगले सरप्राईज दिले आहे. विजय एक प्रभावी खलनायक आहे. फुल ऑन मसाला आणि चित्रपट एकदा बघाच.

अशा प्रकारे आता शाहरुखने त्याला ट्रोल करणाऱ्यांना देखील त्याच्या चित्रपटाच्या प्रेमात टाकले आहे. शाहरुखच्या जवानचा आणि अभिनयाचा करिश्मा इतका जबरदस्त आहे की त्याला सतत नावं ठेवणाऱ्या टिकाकारांनाही त्याने कौतुक करण्यास भाग पाडलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com