Jawan SRK Movie : जवानचे 7 डायलॉग ऐकल्यावर, पठाणचं रेकॉर्ड ब्रेक होणार?

शाहरुख खान हा बॉलीवूडमधील असा हुकमी एक्का आहे की ज्याचे चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतात.
Jawan Movie Shah Rukh Khan Best 7 Dialogues
Jawan Movie Shah Rukh Khan Best 7 Dialoguesesakal

Jawan Movie Shah Rukh Khan Best 7 Dialogues : किंग खानच्या बहुचर्चित अशा जवानचा प्रिव्ह्यू समोर आला आहे. वयाची साठी ओलांडली तरी किंग खान अजूनही चाहत्यांच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय आहे. त्याच्या याअगोदरच्या पठाण नावाच्या चित्रपटानं बॉलीवूडमध्ये वादळ तयार केलं होतं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला होता.

शाहरुख खान हा बॉलीवूडमधील असा हुकमी एक्का आहे की ज्याचे चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतात. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या अभिनेत्यानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. केवळ भारतच नाहीतर जगभरातील कित्येक देशांमध्ये शाहरुखचे चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचा दुबईतील एका अतिउंच आणि भव्य अशा इमारतीवर फोटो झळकला होता. पाकिस्तानमध्येही त्याचा चाहतावर्ग मोठा आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

पठाण ज्यावेळी प्रदर्शित झाला होता तेव्हा तो पाकिस्तानमध्ये देखील लपून छपून दाखवण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता शाहरुखच्या जवानचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. शाहरुखच्या लाखो चाहत्यांनी पठाण आणि या चित्रपटाची तुलना केली आहे. पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करण्याची कामगिरी शाहरुखचा हा चित्रपट करणार असल्याचे बोलले जात आहे.

Jawan Movie Shah Rukh Khan Best 7 Dialogues
Niyat Movie Review : कमजोर कथेमुळे निराश करणारा चित्रपट!

सोशल मीडियावर शाहरुखच्या संबंधी मीम्स आणि काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये पठाणला टक्कर देण्यासाठी आता जवान येतो आहे. त्यातील अनेक साहसदृश्य ही चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यात खासकरुन शाहरुखच्या तोंडी जे संवाद आहेत त्याचीच चर्चा सर्वाधिक होताना दिसते आहे. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय आहे.

ट्रेलरमध्ये जे संवाद किंग खानच्या तोंडी आहेत ते कोणते हे आपण पाहूयात....आतापर्यत ७ संवाद समोर आले आहेत. ते पाहून आणि ऐकून चाहत्यांनी हा चित्रपट एक हजार कोटींची कमाई करणार असल्याचे म्हटले आहे.

1. मैं कौन हूं, कौन नहीं... पता नहीं। मां को किया वादा हूं, या अधूरा एक इरादा हूं।

2. मैं अच्छा हूं, बुरा हूं... पुण्य हूं या पाप हूं? ये खुद से पूछना, क्योंकि मैं भी आप हूं।

3. रेडी?

4. नाम तो सुना होगा

5. ये तो शुरुआत है।

6. गुड टू गो गर्ल्स।

7. जब मैं विलेन बनता हूं ना... तो मेरे सामने कोई भी हीरो, टिक नहीं सकता।

Jawan Movie Shah Rukh Khan Best 7 Dialogues
Jawan Prevue Trailer: मैं कौन हूं कौन नही! शाहरुख खानचा राडा..अखेर जवानचा ट्रेलर रिलिज..

या सात संवादांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे येत्या काळात चाहते मोठ्या आतूरतेनं किंग खानच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com