Shah Rukh Khan Jawan : शाहरुखच्या 'जवान' मधील अ‍ॅक्शन सीनसाठी जगातले टॉपचे 6 'स्टंटमास्टर'!

शाहरुखचा चित्रपट म्हणजे त्याच्या जगभरातील चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. पठाणच्या विक्रमी यशानंतर जवानची चर्चा आहे.
Jawan Shah Rukh Khan Movie 7 September
Jawan Shah Rukh Khan Movie 7 September esakal

Jawan Shah Rukh Khan Movie 7 September : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे. याच वर्षी त्याचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात त्यानं हजार कोटींची कमाई केली होती. आता त्याचा जवान नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

शाहरुखचा चित्रपट म्हणजे त्याच्या जगभरातील चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. पठाणच्या विक्रमी यशानंतर जवानची चर्चा आहे. आतापर्यत त्याचा प्रदर्शित झालेला प्रीव्ह्यू ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहे. चाहते जवानची आतूरतेनं वाट पाहत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

शाहरुखनं जवानसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. जवानच्या बाबत एक खास गोष्ट शेयर केली जात आहे. ती म्हणजे या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी जगभरातील सहा सर्वोत्तम स्टंट मास्टर यांची मदत घेतली गेल्याचे मेकर्सच्या वतीनं सांगण्यात आले आहे. सहा जागतिक दर्जाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर्स करणार जवानाचे धमाकेदार अ‍ॅक्शन सीक्वेन्स डायरेक्ट करणार आहेत.

Jawan Shah Rukh Khan Movie 7 September
Jawan Movie : 300 कोटींचं बजेट, किंग खानचं एक लाखांचं शर्ट, 1 हजार डान्सर! शाहरुखचा नाद करायचा नसतोय!

यामध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर स्पिरो रझाटोस, यानिक बेन, क्रेग मॅकक्रे, केचा खमफाकडी, सुनील रॉड्रिग्स आणि अनल अरासू होणार सहभागी आहेत. यानिमित्तानं शाहरुख बहुप्रतिक्षित 'जवान' द्वारे जगभरातील त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज देणार आहे. चित्रपटाच्या आकर्षक प्रीव्यू आणि गाण्यांनी आधीच लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे.

चित्रपटाचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स देखील संस्मरणीय असतील. निर्मात्यांनी जवानच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सला भव्य बनवण्यासाठी टॉप क्लास अ‍ॅक्शन डायरेक्टर्सची संपूर्ण फौज नियुक्त केली ज्यामध्ये 6 मोठ्या अ‍ॅक्शन डायरेक्टर्सचा समावेश आहे.

Jawan Shah Rukh Khan Movie 7 September
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

एटली दिग्दर्शित जवान, गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्मित, रेड चिलीज एंटरटेनमेंट सादरीकरण आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com