Ritiesh Deshmukh Comment On Jawan : 'शाहरुख म्हणजे अ‍ॅटिट्युडचा बाप', जवान पाहून रितेश इतका भारावला की...!

बॉलीवूडमधील अनेकांनी किंग खानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
Ritiesh Deshmukh Comment On Jawan
Ritiesh Deshmukh Comment On Jawanesakal

Jawan Shah Rukh Khan Movie Riteish Deshmukh X post : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा सध्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय आहे. काल त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा जवान नावाचा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला. त्याचा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमधील अनेकांनी किंग खानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

मराठमोळ्या रितेशनं देखील शाहरुखचं कौतुक केलं आहे. त्यानं ट्विट करुन किंग खानला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचं ते ट्विट चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहेत. रितेशनं केवळ शाहरुखच नाही तर जवानमधील सगळ्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कौतुक कसं आणि किती करावं हे रितेशच्या त्या ट्विटकडे पाहिल्यावर कळते. नेटकऱ्यांनी देखील रितेशला त्या ट्विटवरुन धन्यवाद दिले आहे.

Also Read - Dahi Handi - गुंतवणुकीची उतरंड कशी हवी याचा धडा देणारा उत्सव

यापूर्वी बॉलीवूडमधील प्रसिद्घ अभिनेत्री कंगनानं शाहरुखचं कौतुक केलं होतं. त्यानंतर माधुरीनं देखील तिच्या इंस्टावर जवानचा ट्रेलर शेयर करत आता आपल्याला जवान पाहण्याची खूपच उत्सुकता आहे. असे म्हणत किंग खानच्या जवानची प्रशंसा केली होती. आता रितेशचं ते ट्विट व्हायरल झाले आहे. त्यात त्यानं दिग्दर्शक अॅटली पाहून सान्या मल्होत्रापर्यत सगळ्यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

रितेश आपल्या त्या ट्विटमध्ये म्हणतो की, जवान ही एक इमोशन आहे. तो एक वेगळा अनुभव आहे. थिएटरमध्ये जवान पाहताना जो अनुभव आला तो फारच उत्साहपूर्ण होता. सगळीकडे टाळ्या, शिट्टया वाजत होत्या. अॅटिट्युटचा बाप अशा शब्दांत रितेशनं शाहरुखचं कौतुक केलं आहे. अॅक्शन, इमोशन, रोमान्स आणि डायलॉग डिलिव्हरी हे सगळं भारीच....आणखी काही बाकी आहे का? असा प्रश्नही रितेशनं यावेळी विचारला आहे.

अॅटली, रेड चिलिज, सान्या मल्होत्रा, गौरव वर्मा, गौरी, नयनतारा, दीपिका, विजय सेतुपति यासगळ्यांना टॅग करत त्यांच्याविषयी रितेशनं काही कमेंटस् केल्या आहेत. ज्या चाहत्यांना आवडल्या आहेत. त्यांनी रितेशला देखील धन्यवाद दिले आहेत.

Ritiesh Deshmukh Comment On Jawan
Jawan 2: शाहरुखचा जवान 2 येणार? थेट संजू बाबाने दिली 'या' सीन मधुन तगडी हिंट

जवानविषयी आणखी सांगायचे झाल्यास, शाहरुखच्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले आहे. शाहरुखनं त्याच्या पठाण या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे. काल जवाननं तब्बल ७५ कोटींची कमाई केली आहे. जगभरातून जवानच्या अॅडव्हान्स बुकींगला देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

Ritiesh Deshmukh Comment On Jawan
Jawan Box Office: बापरे बाप! शाहरुखच्या जवानची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, १०० कोटींच्या वर कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com